शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

"दहशतवादाला पोसणं बंद करा, मग परिषदेला या", भारतानं पाकिस्तानला सुनावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2021 6:21 PM

India Slams Pakistan In UN: भारतानं पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र संघाच्या (United Nations)  परिषदेत पाकिस्तानला (Pakistan) खडेबोल सुनावले आहेत.

भारतानं पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र संघाच्या (United Nations)  परिषदेत पाकिस्तानला (Pakistan) खडेबोल सुनावले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क परिषदेत (UN Human Right Council) भारतानं आक्रमक भूमिका घेत पाकिस्ताननं आधी दहशतवादाला पोसणं बंद करावं, त्यानंतरच परिषदेला यावं, अशा कडक शब्दांत पाकला सुनावलं आहे. (India Slams Pakistan In UN)

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानचा संयुक्त राष्ट्राच्या फायनांशियल अॅक्शन टास्क फोर्सनं पुन्हा एकदा ग्रे लिस्टमध्ये समावेश केला आहे. मानवी हक्क परिषदेच्या ४६ व्या सत्रात ''राइट टू रिप्लाय'' याचा उपयोग करत भारतानं पाकिस्तानवर शरसंधान केलं. "आमच्या शेजारील देशानं दहशतवाद्यांना पोसणं आणि आपल्या देशातील अल्पसंख्याकांचा छळ करणं बंद करावं. त्यानंतरच परिषदेला यावं", अशी टीका भारतानं केली. 

पाकिस्तानकडून संयुक्त राष्ट्र संघाच्या व्यासपीठाचा वापर भारताविरोधात केवळ अपप्रचार करण्यासाठी वापर केला जातो, असं भारताच्या स्थायी मिशनचे सचिव पवनकुमार बढे (Pawankumar Badhe) यांनी म्हटलं. यासोबतच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्ताननं परिषदेचा वेळ वाया घालवणं बंद करायला हवं, असाही खोचक टोला त्यांनी लगावला. 

दहशतवाद्यांना पेंशन देतं पाकिस्तानपाकिस्ताननं सीमेवरील दहशतवाद रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासोबत देशातील अल्पसंख्याकावरील अत्याचार थांबवायला हवेत. संयुक्त राष्ट्र संघानं मोस्ट वॉन्टेड यादीत समावेश केलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडूनच पेंशन दिलं जातं याची परिषदेला उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच कल्पना आहे. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना पोसण्याचं काम सुरू आहे. ते केव्हा थांबणार? यावर कडक भूमिका घेण्याची गरज असल्याचंही पवनकुमार बढे म्हणाले. 

दहशतवादाला समर्थनातून मानवी हक्कांची पायामल्ली पाकिस्तान हा दहशतवादी निर्माण करणारा कारखाना आहे याची कबुली खुद्द पाकिस्तानातील काही नेत्यांनीच याआधीही दिली आहे, याचा पुनरुच्चार भारतानं परिषदेत केला. मानवी हक्कांची पायामल्ली करणारं दहशतवाद हे अतिशय गंभीर स्वरुप आहे. दहशतवाद्यांना समर्थन दिल्यामुळे मानवी हक्कांची पायामल्ली होते याची नोंद संयुक्त राष्ट्रानं घ्यावी, असं भारतानं म्हटलं.  

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndiaभारतTerrorismदहशतवाद