शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

शरीरात दिसणारं हे लक्षण असू शकतं आकस्मिक मृत्यूचा संकेत, घटते आयुर्मान, संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 17:00 IST

Health News: सर्वसाधारणपणे व्यक्तीची वृद्धावस्था ही अनुवांशिक आणि लाईफस्टाईलवर अवलंबून असते. वाढत्या वयासोबत व्यक्तीला येणारा थकवासुद्धा वाढू लागतो. मात्र नव्याने झालेल्या संशोधनानुसार थकवा हा एखाद्या व्यक्तीच्या अकाली म्हणजेच वेळेपूर्वी होणाऱ्या मृत्यूचा संकेत असून शकतो. 

लंडन - सर्वसाधारणपणे व्यक्तीची वृद्धावस्था ही अनुवांशिक आणि लाईफस्टाईलवर अवलंबून असते. वाढत्या वयासोबत व्यक्तीला येणारा थकवासुद्धा वाढू लागतो. मात्र नव्याने झालेल्या संशोधनानुसार थकवा हा एखाद्या व्यक्तीच्या अकाली म्हणजेच वेळेपूर्वी होणाऱ्या मृत्यूचा संकेत असून शकतो. जर्नल ऑफ ग्रोन्टोलॉजी: मेडिकल सायन्सेस मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार तणावामुळे होणारा मानसिक आणि शारीरिक थकवा व्यक्तीच्या लवकर होणाऱ्या मृत्यूचे संकेत देऊ शकते. या संशोधनासाठी ६० वर्षे किंवा यापेक्षा अधिक वयाच्या २ हजार ९०६ सॅम्पल्सची चाचणी करण्यात आली. या संशोधनात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना संशोधकांनी काही अ‍ॅक्टिव्हिटीच्या आधारावर एकपासून पाचपर्यंतच्या स्केलवर थकव्याचा स्तर विचारला होता.

यामध्ये ३० मिनिटांचे चालणे, हलके घरकाम आणि बागकामासारख्या कामांचा समावेश करण्यात आला होता. मृत्युदरावर परिणाण करणाऱ्या सर्व घटकांचा विचार केल्यानंत संशोधकांनी पाहिले की, या सर्व कार्यामध्ये सहभागी झालेल्या ज्या स्वयंसेवकांना अधिक थकवा जाणवला, त्यांच्यामद्ये आकस्मिक मृत्यूचा धोका अधिक दिसून आला. त्यासाठी डिप्रेशन, आधीपासून असलेला कुठला तरी असाध्य आजार, वय आणि लिंग यासारख्या घटकांनी परिणाम केले.

पिट्स ग्रॅज्युएट स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या एपिडेमायोलॉजी डिपार्टमेंटमध्ये असोसिएट्स प्राध्यापक आणि संशोधनाचे प्रमुख लेखक नॅन्सी डब्ल्यू ग्लिन यांनी सांगितले की, ही अशी वेळ आहे जेव्हा लोक अधिकाधिक फिजिकली फिट राहण्यासाठी नववर्षावेळी नवनवे संकल्प करत आहेत. मला अपेक्षाआहे की, आमचे आकडे लोकांना व्यायामाचे महत्त्व समजावून देण्यात मदत करतील.

एका मागच्या संशोधनामध्ये याबाबतचे संकेत मिळत होते की, ज्यात अधिक फिजिकली अ‍ॅक्टिव्ह राहिल्यामुळे व्यक्तीच्या आत थकव्याचा स्तर कमी होऊ शकतो. तर आमचे पहिले असे अध्ययन आहे. ज्यामध्ये अधिक गंभीर शारीरिक थकव्याला अकाली मृत्यूशी जोडण्यात आले आहे. स्केलवर लोअर स्कोट व्यक्तीच्या अधिक उर्जावान आणि दीर्षायुष्याकडे इशारा करतो. याआधीच्या एका संशोधनानुसार दररोजची नियमित १५ मिनिटांची शारीरिक कसरत व्यक्तीच्या जीवनातील तीन वर्षे वाढवत असते.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स