शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

मेड इन चायनाचा 'या' देशाला बसला मोठा फटका; 3700 निरोगी लोकांना दाखवलं 'कोरोना पॉझिटिव्ह'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 10:51 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: मेड इन चायनाचा एका देशाला मोठा फटका बसला आहे. तब्बल 3700 निरोगी लोकांना 'कोरोना पॉझिटिव्ह' दाखवण्यात आलं आहे.

बीजिंग/ स्टॉकहोम - जगभरात कोरोना व्हायरसचा कहर पाहायला मिळत आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल दोन कोटींच्या वर गेली असून रुग्णांची एकूण संख्या 24,058,354 आहे. कोरोनामुळे आतापर्यंत आठ लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेड इन चायनाचा एका देशाला मोठा फटका बसला आहे. तब्बल 3700 निरोगी लोकांना 'कोरोना पॉझिटिव्ह' दाखवण्यात आलं आहे. स्वीडनमध्ये हा प्रकार घडला असून लोकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. 

स्वीडनच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने चीनमधून आयात करण्यात आलेले कोरोना टेस्ट किट सदोष असल्याचं म्हटलं आहे. या किटच्या मदतीने चाचण्या करण्यात आलेले 3700 जण सुरुवातीला कोरोना पॉझिटिव्ह दाखवण्यात आले. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र हे लोक निरोगी असल्याची माहिती आता समोर आली आहे. कोरोनाच्या चाचणी किटमध्ये असलेल्या दोषांमुळे असा चुकीचा रिपोर्ट मिळाल्याचं म्हटलं जात आहे. 

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार चीनमधून आयात करण्यात आलेले पीसीआर (PCR) कोरोना चाचणी किट सदोष असल्याने या किटच्या मदतीने करण्यात आलेल्या सर्व चाचण्यांचे निकाल पॉझिटिव्ह दाखवण्यात आले. चीनमधील BGI Genomics कंपनीच्या या टेस्ट किटमुळे हा गोंधळ निर्माण झाला आहे. याच कंपनीचे किट जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवले जात आहेत. या किटच्या मदतीने चाचणी करण्यात आलेल्या लोकांमध्ये कोरोनाची कोणतीच लक्षण दिसून येत नव्हती. मात्र चाचणीचे निकाल पॉझिटिव्ह आल्याने हे ए-सिम्पटोमॅटिक रुग्ण असल्याचे गृहित धरुन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. 

स्वीडनमध्ये मार्च महिन्यापासून किटच्या आधारे कोरोना चाचण्या घेण्यात येत आहेत आणि याच चाचण्यांच्या आधारावर देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ठरवला जात आहे. त्यामुळेच आता स्वीडनमधील आरोग्य खातं सर्वच प्रकरणांची चौकशी करण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं जात आहे. स्वीडनने दिलेल्या माहितीनुसार, या कोरोना चाचणी किटच्या वापरामुळे करोनासारखी लक्षण असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोरोना पॉझिटिव्ह दाखवण्यात आलं. ज्या ज्या लोकांना सर्दी किंवा ताप आहे ते सर्व कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे आता आरोग्य विभागाने या लोकांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : देशात कोरोनाचा वेगाने प्रसार होण्यामागे 'हे' आहे कारण, ICMR ने दिला गंभीर इशारा

Mahad Building Collapse: 'इमारत असो वा समाज, पाया हा मजबूतच हवाच'; सुबोध भावेचं सूचक ट्विट 

CoronaVirus News : एक कोरोना पॉझिटिव्ह सापडला की पालिकेला दीड लाख रुपये मिळतात?, जाणून घ्या 'त्या' मागचं सत्य

"गद्दार भाजपाच्या चीन प्रेमाचा धिक्कार, बंदी घातलेल्या चीनी अ‍ॅपचा करताहेत वापर"

CoronaVirus News : काँग्रेसच्या संकटमोचकावरच कोरोनाचे संकट; डी. के. शिवकुमार पॉझिटिव्ह

सायकल घेणं शक्य नव्हतं म्हणून बाप-लेकानं केला भन्नाट 'जुगाड'; Video तुफान व्हायरल

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनDeathमृत्यू