शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

तालिबाननं पंजशीरवर कब्जा केल्याच्या दाव्यावर सस्पेन्स कायम; ताजिकिस्तानमधील अफगाण राजदूत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 23:35 IST

Taliban Afghanistan Crisis : रविवारी तालिबाननं पंजशीरवरही ताबा मिळवल्याचा केला होता दावा.

ठळक मुद्देरविवारी तालिबाननं पंजशीरवरही ताबा मिळवल्याचा केला होता दावा.

संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर पंजशीर हा एकच असा प्रांत होता जिकडे तालिबानला पोहोचता आलं नव्हतं. पंजशीरमधून तालिबांनींना जशासतसं उत्तर देण्यात येत होतं. परंतु आता या प्रांतावरही ताबा मिळवल्याचा दावा तालिबानकडून करण्यात आलाल आहे. पंजशीरच्या प्रत्येक मुख्यालय, पोलीस मुख्यालय आणि सर्व कार्यालयांवर ताबा मिळवण्यात आल्याचा दावा तालिबानच्या प्रवक्त्यानं रविवारी केला.

तर दुसरीकडे अशी माहितीही समोर येत आहे की सेंट्रल पंजशीरवर तालिबाननं कब्जा केला आहे. जनरल जरातनं फ्रन्टला धोका दिला त्यानंतर सेंट्रल पंजशीरवर कब्जा करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पंजशीर रोडवर तालिबानचा कब्जा आहे. परंतु खोऱ्यावर नॉर्दन फ्रन्टचा कब्जा असून अगमद मसूद आणि अमरूल्लाह सालेह पंजशीर खोऱ्यात आहेत. पंजशीरच्या दाव्याचं नॉर्दन अलायन्सनं याचं खंडन केलं आहे. तसंच नॉर्दन अलायन्सचं समर्थन करणारे ताजिकिस्तानमधील अफगाणिस्तानाचे राजदूत जहीर अघबर यांनी तालिबान आणि नॉर्दन अलायन्सची झटापट झाल्याचं सांगितलं. परंतु त्यांना कब्जा करता आला नसल्याचं त्यांनी आजतकशी बोलताना सांगितलं.

... तरच शांततेसाठी तयार दरम्यान, एका फेसबुक पोस्टद्वारे नॉर्दन फ्रन्टचं नेतृत्व करणाऱ्या अहमद मसूद यांनी धार्मिक स्कॉलर्सकडून करण्यात येत असलेल्या शांततेच्या संदेशाचं स्वाग केलं. जर तालिबान आपल्या लोकांना पंजशीर आणि अंदराबमधून माघारी बोलवत असेल तर आपण शांततेसाठी तयार आहोत, असंही अहमद मसूद यांनी म्हटलं. 

यापूर्वीही तालिबाननं पंजशीरच्या गव्हर्नर हाऊसवर कब्जा केल्याचा दावा केला होता. तसंच यानंतर तालिबांनींनी आनंद साजरा करत हवाई फायरिंग केलं होतं. यामध्ये अनेक लोकांचा जीव गेला होता. पंजशीरवर तालिबाननं कब्जा केल्याच्या दाव्याचं मसूद यांनी खंडन केलं होतं. पंजशीरवर आपलंच नियंत्रण असल्याचा दावा मसूद यांनी केला. तसंच ज्या दिवशी तालिबान पंजशीरवर ताबा मिळवेल तो आपल्या खोऱ्यातील अखेरचा दिवस असेल असंही ते म्हणाले होते. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानInternationalआंतरराष्ट्रीयGovernmentसरकार