शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

'आम्ही वैज्ञानिक तयार केले, तुम्ही दहशतवादी आणि जिहादी तयार केले', सुषमा स्वराजांनी पाकिस्तानला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 9:32 PM

आम्ही वैज्ञानिक तयार केले, तुम्ही दहशतवादी आणि जिहादी तयार केले अशा सणसणीत शब्दांत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीचत बोलताना सुषमा स्वराजांनी सडेतोड भाषण करत पाकिस्तानला एकामागोमाग एक चपराक लगावल्या.

ठळक मुद्देसंयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत बोलताना सुषमा स्वराजांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले'ज्या देशाने सर्व सीमा पार केल्या आहेत तो देश आम्हाला अहिंसा आणि मानवता शिकवत होता''आम्ही वैज्ञानिक तयार केले, तुम्ही दहशतवादी आणि जिहादी तयार केले' 'आम्ही आयआयटी उभारले पण तुम्ही लष्कर-ए-तोयबा, हिजबूल मुजाहिद्दीन, हक्कानी बनवलं'

न्यू यॉर्क - आम्ही वैज्ञानिक तयार केले, तुम्ही दहशतवादी आणि जिहादी तयार केले अशा सणसणीत शब्दांत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत बोलताना सुषमा स्वराजांनी सडेतोड भाषण करत पाकिस्तानला एकामागोमाग एक चपराक लगावल्या. यावेळी त्यांनी भारतावर आरोप करणा-या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खान अब्बासी यांना ज्या देशाने दहशतवाद आणि हिंसेच्या सर्व सीमा पार केल्या आहेत तो देश आम्हाला अहिंसा आणि मानवता शिकवत होता असा टोला लगावला. 

आम्ही गरिबीशी लढत आहोत, पण पाकिस्तान आमच्याशी लढत आहे असं सांगत सुषमा स्वराजांनी आपल्या भाषणास सुरुवात केली. यावेळी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खान अब्बासी यांचं भाषण सुरु असताना प्रत्येकजण 'कोण बोलतंय ते पहा' (Look who is talking) असं बोलत होतं असा टोलाही लगावला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतकं सर्व होऊनही शांततेसाठी मैत्रीचा हात पुढे केला होता, पण पुढे काय झालं ते सर्वांना माहित आहे अशी आठवण त्यांनी पाकिस्तानला करुन दिली. सोबतच पाकिस्तानला सर्व लक्षात आहे, पण विसरण्याचं नाटक करत असतात अशी टीका केली. 'भारत आणि पाकिस्तान एकत्र स्वतंत्र झाला, पण कधी तुम्ही एकत्र बसून विचार केला आहे का ? भारताने इतकी प्रगती केली पण दहशतवादी देश म्हणून आपली ओळख निर्माण का झाली हा विचार पाकिस्तानने कधी केला आहे का ? असा सवाल सुषमा स्वराजांनी विचारला. 

पाकिस्तानला तोंड देताना आम्ही देशाच्या विकासात कोणतीही हयगय केली नाही असं सुषमा स्वराजांना ठामपणे सांगितलं. आम्ही आयआयटी उभारले पण तुम्ही लष्कर-ए-तोयबा, हिजबूल मुजाहिद्दीन, हक्कानी बनवलं. आम्ही वैज्ञानिक तयार केले, आणि तुम्ही दहशतवादी आणि जिहादी तयार केले अशा शब्दांत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावलं. 

जो पैसा तुम्ही दहशतवाद्यांसाठी खर्च करत आहात तो पैसा देशाच्या नागरिकांसाठी वापरलात तर तुमच्या लोकांचं भलं होईल, त्यांचा विकास होईल असा सल्लाच सुषमा स्वराजांनी देऊन टाकला. यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्रांना दहशतवाद ही आपली प्रमुख समस्या आहे. त्याच्याविरोधात लढण्यासाठी आपण एकजूट झालो पाहिजे. वेगवेगळ्या नजरेने दहशतवादाकडे पाहणं थांबवलं पाहिजे असं आवाहनही केलं. 

सर्वे संतू निरामयाः ही तर आमची संस्कृती

आम्ही केवळ आमच्याच सुखाचा आनंदाचा विचार करत नाही तर आमची संस्कृती सगळे जग सुखी व्हावे असा विचार करते असे सांगत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्राच्या ७२ व्या आमसभेत वसुधैव कुटुंबकमची घोषणा केली.

आतापर्यंतच्या सर्व सरकारचा उल्लेख

सुषमा स्वराज यांनी आपल्या भाषणात मुद्रा योजना, उज्ज्वला योजना, जनधन योजना, स्टार्टअप इंडिया- स्टँडअप इंडिया, स्वच्छ भारत या मोदी सरकारच्या योजनांचा उल्लेख केला असला तरी पाकिस्तानला उत्तर देताना भारतातील अाजवरच्या विविध पक्षांच्या सरकारचा उल्लेख केला. विविध पक्षांची सरकारे भारतात आली तरी अंतर्गत विकासावरील लक्ष त्यांनी कमी केले नाही गेल्या सत्तर वर्षांमध्ये आम्ही आयआयटी, आयआयएम, एम्स, इस्रोसारख्या संस्था तयार केल्या असे सांगत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत म्हणून आम्ही एकत्रित प्रयत्न करतो असा संदेश सर्वांना दिला. गेली सत्तर वर्षे आम्ही गरिबीशी लढतोय असे सांगत आधीच्या सरकारांनाही त्यांनी त्यांच्या कामाची पोचपावती दिली.यामुळे भारतातही याचे चांगले परिणाम दिसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजBJPभाजपाPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद