Sunita Williams : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्सचे (Sunita Williams) अनेक महिन्यांपासून अंतराळात अडकल्या आहेत. त्यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी NASA कडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. आधी अशी बातमी आली होती की, जानेवारी किंवा फेब्रुवारी 2025 मध्ये त्यांना पृथ्वीवर आणले जाणार आहे. पण, आता त्यांच्या परतण्याची तारीख पुन्हा वाढली आहे.
NASA ने मंगळवारी सांगितले की, सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांना मार्च 2025 पूर्वी परत आणणे शक्य होणार नाही. दोन्ही अंतराळवीर जून 2024 पासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) अडकून आहेत. बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानामध्ये बिघाड झाल्यामुळे, सुनिता आणि बुच अंतराळात अडकून पडले आहेत. नासाने यापूर्वी सांगितले होते की, फेब्रुवारी 2025 पर्यंत सुनीता आणि बुच यांना परत आणण्यासाठी एक अंतराळयान स्पेस स्टेशनवर जाईल. पण, आता यात नवीन माहिती समोर आळी आहे. नासाच्या म्हणण्यानुसार, मार्च 2025 पूर्वी त्यांना परत आणणे शक्य नाही.
इलॉन मस्क यांच्या कंपनीवर जबाबदारीनासाने सुनीता आणि बुच यांना परत आणण्याची जबाबदारी इलॉन मस्कची कंपनी स्पेसएक्सवर दिली आहे. दोन्ही अंतराळवीर क्रू-10 ड्रॅगन कॅप्सूलद्वारे परत येतील. मंगळवारी नासाने सांगितले की, क्रू-10 मार्च 2025 पूर्वी लॉन्च होऊ शकत नाही. रिपोर्ट्सनुसार, जुन्या क्रूला स्पेस स्टेशनवरुन परत आणण्याआधी, नवीन क्रू लॉन्च करणे आवश्यक आहे. आता आगामी मोहिमेचे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले आहे. NASA चे कमर्शियल क्रू प्रोग्राम मॅनेजर स्टीव्ह स्टिच म्हणाले, नवीन स्पेसक्राफ्टची फॅब्रिकेशन, असेंबली, टेस्टिंग आणि फायनल इंटिग्रेशन ही एक लांब प्रक्रिया आहे, त्यामुळे वेळ लागतोय.
सुनीता आणि बुच 5 जून 2024 पासून स्पेस स्टेशनवर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर 5 जून रोजी अवघ्या आठवडाभराच्या मोहिमेसाठी स्पेस स्टेशनवर गेले होते. पण, अंतराळ यानामध्ये काही त्रुटी आल्यामुळे दोघेही तिथेच अडकून पडले. तेव्हापासून या दोघांना परत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, सुनिता आणि बुच अनुभवी अंतराळवीर आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांना राहण्याची सवय आहे. पण, इतके दिवस अंतराळात राहिल्यामुळे त्यांच्या शरीरावर नक्कीच परिणाम होण्याची शक्यता आहे.