शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown : कोरोना नव्हे, जगभरात 'या' व्हायरसमुळे होणार 14 लाख अधिक मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 22:18 IST

कोरोना व्हायरसमुळे जगातील अनेक देशांत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे, आता लॉकडाउनमुळे इतर आजारांचा आणि त्यामुळे मरणारांची संख्या वाढण्याचा धोकाही वाढला आहे.

ठळक मुद्देया रिसर्चनुसार, 2025पर्यंत टीबीमुळे 14 लाख मृत्यू अधिक होऊ शकतात टीबीवर यशस्वी उपचार उपलब्ध आहेत, तरीही यामुळे दरवर्षी लाखो लोक मरण पावतातटीबीमुळे भारत, केनिया आणि यूक्रेनसारखे देश अधिक प्रभावित होतील

लंडन : कोरोना व्हायरसमुळे जगातील अनेक देशांत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी लॉकडाउनची तर घोषणा झाली. पण, आता लॉकडाउनमुळे इतर आजारांचा आणि त्यामुळे मरणारांची संख्या वाढण्याचा धोकाही वाढला आहे. एका रिसर्चनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे ट्यूबरक्लोसिसमुळे (टीबी) होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ होऊ शकते. या रिसर्चनुसार, 2025पर्यंत टीबीमुळे 14 लाख मृत्यू अधिक होऊ शकतात.

आणखी वाचा - Lockdown : 30 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असणाऱ्यांना मिळणार मोठी 'भेट'? सरकार लवकरच करू शकतं घोषणा 

टीबीच्या संसर्गात व्हायरसचा हल्ला संक्रमित व्यक्तीच्या फुफ्फुसावर होतो. अनेक ठिकाणी या आजारावर उपचार होतात. मात्र, असे असतानाही दरवर्षी जवळपास 1 कोटी लोक टीबीमुळे संक्रमित होतात. जागतीक आरोग्य संगघटनेच्या आकडेवारीनुसार, केवळ 2018मध्येच संपूर्ण जगात टीबीमुळे 15 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. यात जवळपास 2 लाख मुलांचा समावेश होता. 

सोशल डिस्टंसिंगच्या नियमांमुळे होणार अधिक मृत्यू -टीबीवर यशस्वी उपचार उपलब्ध आहेत. तरीही यामुळे दरवर्षी लाखो लोक मरण पावतात. तज्ज्ञांच्या मते टीबीवरील उपचारातही टेस्टिंग आणि लवकरात लवकर उपचार सुरू करणे आवश्यक असते. तज्ज्ञ सांगतात, की कोरोना व्हायरसमुळे जगभरात लॉकडाउन सुरू आहे. यामुळे टीबीचा आजार घातक रूप धारण करून परतू शकतो. कारण हेल्थ वर्कर्स सोशल डिस्टंसिंगच्या नियमांच्या पालणामुळे संक्रमित रुग्णांची वेळेवर टेस्ट करू शकणार नाहीत. परिणामी रुग्णांना वेळेवर उपचार मिळाणार नाही. अशा परिस्थितीत टीबी घातक सिद्ध होऊ शकतो आणि यामुळे लोकांचा मृत्यू होऊ शकतो.

आणखी वाचा - 'अशी' आहे रियाज नायकूच्या खात्म्याची 'इनसाइट स्टोरी'; भुयारातून करायचा ये-जा, जवानांनी तेथेच खोदली कबर

सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये भारत -कोरोना व्हायरसमुळे आता नव्याच प्रकारची समस्या समोर येत आहे. यामुळे इतर संक्रमित आजारांचा धोकाही वाढला आहे. लंडनच्या इंपिरियल कॉलेजच्या आकडेवारीनुसार, टीबीमुळे भारत, केनिया आणि यूक्रेनसारखे देश अधिक प्रभावित होतील.

संबंधित आकडेवारीनुसार, दोन महिन्यांच्या अतिरिक्त लॉकडाउनमुळे संपूर्ण जगात 5 वर्षांत टीबीचा संसर्ग झालेले 18 लाख अधिक रुग्ण समोर येऊ शकतात. यामुळे जवळ-जवळ 3 लाख 40 हजार जणांचा मृत्यू होऊ शकतो.

आणखी वाचा - CoronaVirus, LockdownNews: लॉकडाउनचं उल्लंघन करणाऱ्यांना उघडं करून मारतोय 'ड्रग लॉर्ड' अल चापोचा मुलगा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याLondonलंडनEnglandइंग्लंडIndiaभारत