'शांततेसाठी ताकद आवश्यक', चीनने पुन्हा संरक्षण बजेट वाढवले; वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 11:50 IST2025-03-05T11:47:26+5:302025-03-05T11:50:58+5:30
चीन सरकारने काल संरक्षण बजेट मांडले, या बजेटमध्ये आता पुन्हा एकदा मोठी वाढ केली आहे.

'शांततेसाठी ताकद आवश्यक', चीनने पुन्हा संरक्षण बजेट वाढवले; वाचा सविस्तर
चीनने बुधवारी संरक्षण बजेट मांडले. चीनने पुन्हा एकदा संरक्षण बजेटमध्ये मोठी वाढ केली आहे. संरक्षणासाठी चीनने २४९ अरब डॉलर जाहीर केले आहेत. ही रक्कम मागील वर्षीच्या बजेटपेक्षा ७.२ टक्के जास्त आहे.
Donald Trump: २ वेळा भारताचा उल्लेख, टॅरिफवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा; अमेरिकेला हवंय तरी काय?
चीनचे पंतप्रधान ली कियांग यांना सादर केलेल्या मसुद्याच्या अर्थसंकल्पात यावर्षी चीनचे संरक्षण बजेट १.७ ट्रिलियन युआन निश्चित केले आहेत. चीन आपल्या सैन्याची ताकद वाढवण्यासाठी आणि लष्करी शस्त्रे वाढवण्यासाठी खूप पैसा खर्च करत आहे. शांतता आणि सार्वभौमत्वासाठी ताकद आवश्यक असल्याचे चीनने मंगळवारी म्हटले.
अमेरिकेला प्रत्येक आघाडीवर शह देण्यासाठी चीन प्रयत्न करत आहे. भारतापेक्षा चीनचे संरक्षण बेजट तीन पटीने जास्त आहे. काही दिवसापूर्वीच केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये ७५ अरब डॉलर सैन्यासाठी जाहीर केले आहेत.
टॅरिफ वॉरबाबत चिंता व्यक्त केली
अमेरिकेसोबतच्या वाढत्या व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीनने यावर्षी सुमारे ५% वाढीचे लक्ष्य ठेवले आहे. चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी व्यापार युद्धाबद्दल चिंता व्यक्त केली. 'अमेरिकेने शुल्क लादण्याच्या निर्णयाचा आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, परंतु आम्ही अमेरिकेच्या आव्हानांना तोंड देण्यास तयार आहोत, असं ली कियांग म्हणाले.
अमेरिकेने चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर २० टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, चीनने अमेरिकेवर १० आणि १५ टक्के कर लादण्याची घोषणाही केली आहे. चीन सरकारने सोया, गहू, कॉर्न, कापूस यासारख्या अमेरिकन कृषी उत्पादनांवर १५% आणि डुकराचे मांस, गोमांस, सीफूड, फळे, भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थांवर १०% कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.