अजब! चंद्राचा तुकडा विक्रीला; किंमत करोडोंच्या घरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 16:04 IST2020-05-11T16:02:53+5:302020-05-11T16:04:32+5:30
चंद्राचा हा तुकडा एका लघू ग्रह किंवा धुमकेतूला आदळल्याने तुटला असावा. यानंतर हा तुकडा सहाराच्या वाळवंटात पडला.

अजब! चंद्राचा तुकडा विक्रीला; किंमत करोडोंच्या घरात
ब्रिटनच्या लंडन शहरामध्ये एक चंद्राचा तुकडा विक्रीला ठेवण्यात आला आहे. या तुकड्याचे वजन १३.५ किलो आहे. या तुकड्याची सुरुवातीची किंमत दोन दशलक्ष पाऊंड म्हणजेच १९ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. लंडनच्या लिलाव करणारी क्रिस्टीने हा लिलाव ठेवला आहे.
चंद्राचा हा तुकडा एका लघू ग्रह किंवा धुमकेतूला आदळल्याने तुटला असावा. यानंतर हा तुकडा सहाराच्या वाळवंटात पडला. या तुकड्याला एनडब्ल्यूए-12691 हे नाव देण्यात आले आहे. हा पृथ्वीवर मिळालेला चंद्राचा पाचवा सर्वांत मोठा तुकडा आहे.
अधिकृतरित्या पृथ्वीवर चंद्राचे ६५० किलोचे तुकडे आहेत. यामध्ये हा देखील आहे. या तुकड्याचा आकार फुटबॉल एवढा आहे. क्रिस्टीचे विज्ञान आणि प्रकृतीच्या इतिहासाचे प्रमुख जेम्स ह्यसलोप यांनी सांगितले की, तुमच्या हातात असा तुकडा ठेवण्याची संधी आहे जी तुम्ही कधीही विसरू शकणार नाही.
हा एक चंद्राचा खराखुरा तुकडा आहे. हा तुकडा माणसाच्या डोक्यापेक्षा थोडा मोठा आहे. संग्रहालयांकडून चांगली किंमत मिळण्याची आशा आहे. चंद्राप्रती प्रेम किंवा रुचि ठेवणाऱ्या व्यक्तीसाठी ही एक पर्वणीच आहे. हा तुकडा एका अज्ञात संशोधकाकडून सहारा वाळवंटात शोधण्यात आला आहे. यानंतर हा तुकडा एकाकडून दुसऱ्याकडे, तिसऱ्याकडे असा फिरत राहिला. हा दगड आता क्रिस्टीकडे आहे.
धक्कादायक! इराणने स्वत:च्याच युद्धनौकेवर मिसाईल डागले; 19 नौसैनिकांचा मृत्यू