अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 17:16 IST2026-04-09T17:15:36+5:302026-04-09T17:16:17+5:30

स्थानिक माध्यमे आणि काही संघटना पाकिस्तानला नोबेल शांतता पुरस्कार देण्याची मागणी करत आहेत.

Strange joke After US-Iran ceasefire, Pakistan directly demands 'Nobel Peace Prize' | अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी

अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी


अमेरिका आणि इराणमध्ये बुधवारी झालेल्या सशर्त युद्धविरामाचे श्रेय घेण्यासाठी पाकिस्तानचा जोरदार आटापिटा सुरू आहे. आता पाकिस्तानला नोबेल शांतता पुरस्कार देण्याची मागणी केली जात आहे. ही मागणी म्हणजे अजबच विनोद आणि अत्यंत हास्यास्पद वाटते. स्थानिक माध्यमे आणि काही संघटना पाकिस्तानला नोबेल शांतता पुरस्कार देण्याची मागणी करत आहेत.

खरेतर, युद्धविरामाची घोषणा करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शहबाज शरीफ आणि मुनीर यांचा उल्लेख केला होता. पाकिस्तानातील स्थानिक माध्यमे हाचीच चर्चा करत आपला अजेंडा पुढे रेटताना दिसत आहे आणि नोबेल शांतता पुरस्काराची मागणी करत आहेत. युद्धविरामासाठी मध्यस्थी करण्यात पाकिस्तानच्या भूमिकेवर माध्यमे सातत्याने प्रकाश टाकत आहेत आणि त्याचे श्रेय स्वतःकडे घेत आहेत. यासाठी पंतप्रधान शहबाज शरीफ आणि आसिम मुनीर यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळावा, अशी मागणी ते करत आहेत.

निवृत्त लेफ्टनंट कर्नल सय्यद अहमद नदीम कादरी यांनी 'द नेशन'मधील लेखात म्हटले की, पाकिस्तानने जागतिक ऊर्जा पुरवठा स्थिर केला आणि मोठे युद्ध रोखले. कराची चेंबर ऑफ कॉमर्सनेही याचे पूर्ण श्रेय शरीफ आणि मुनीर यांना दिले आहे.

चीनने की पाकिस्तानने? युद्ध विरामात महत्वाची भूमिका कुणाची? -
पाकिस्तान स्वतःच्या स्तुतीमध्ये मग्न असला तरी, अनेक अहवालांनुसार पाकिस्तानने केवळ अमेरिकेच्या इशाऱ्यावर 'मोहऱ्या'सारखी भूमिका बजावली आहे. दुसरीकडे, इराणला खऱ्या अर्थाने चर्चेच्या टेबलावर आणण्याचे काम चीनने केल्याचे स्पष्ट झाले आहे. खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनीही चीनच्या भूमिकेची पुष्टी केली आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, चीनने आपल्या शक्तीचा वापर करून इराणवर दबाव आणला आणि त्यांना सीजफायरसाठी तयार केले.

पाकिस्तान नोबेल शांतता पुरस्कार, शहबाज शरीफ असीम मुनीर नोबेल, अमेरिका इराण सीजफायर चीन, पाकिस्तान इराण मध्यस्थी, Pakistan Nobel Peace Prize Demand, Shehbaz Sharif Asim Munir Nobel, US Iran Ceasefire China Role, Pakistan Mediation News,

Web Title : अमेरिका-ईरान युद्धविराम के बाद पाकिस्तान का नोबेल शांति पुरस्कार दावा: एक मज़ाक?

Web Summary : पाकिस्तान अमेरिका-ईरान युद्धविराम का श्रेय चाहता है, अपने नेताओं के लिए नोबेल शांति पुरस्कार की मांग कर रहा है। मीडिया उनकी भूमिका पर प्रकाश डालता है, लेकिन रिपोर्ट बताती हैं कि चीन ने ईरान को बातचीत की मेज पर लाने में अधिक महत्वपूर्ण भूमिका निभाई।

Web Title : Pakistan's Nobel Peace Prize demand after US-Iran ceasefire: A joke?

Web Summary : Pakistan seeks credit for the US-Iran ceasefire, demanding a Nobel Peace Prize for its leaders. Media highlights their role, but reports suggest China played a more significant part in bringing Iran to the table.