शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

राजघराण्यातील वादळे... बंड करत प्रिन्स हॅरीने तोडले संबंध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 7:49 AM

मुद्द्याची गोष्ट : ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांचे नुकतेच वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले. राणीपदाच्या 70 वर्षांच्या कारकीर्दीत राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांनी जितक्या जागतिक घडामोडी पाहिल्या, तितक्याच ब्रिटनच्या राजघराण्यातील उलथापालथींचे, वादांचे चटकेही सोसले.

समीर परांजपे, 

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांनी आपल्या सात दशकांच्या कारकीर्दीत राजघराण्यातील अनेक वादळांना तोंड दिले. त्याची सुरुवात त्यांची धाकटी बहीण मार्गारेटपासून झाली होती. मार्गारेट हिने वायुसेनेतला धडाकेबाज अधिकारी ग्रुप कॅप्टन पीटर टाऊनसेंड याच्याबरोबर विवाह करण्याचे ठरविले होते. मात्र पीटर हे घटस्फोटित होते. ब्रिटनच्या राजघराण्याच्या त्यावेळच्या संकेतांप्रमाणे पीटर यांच्याशी मार्गारेटचा विवाह होणे गैर मानले गेले. त्यामुळे मार्गारेटला हा विवाह रद्द करण्यास भाग पाडण्यात आले. मार्गारेटने नंतर अँथनी आर्मस्ट्राँग-जोन्सशी लग्न केले. त्याने लॉर्ड स्नोडन ही पदवी धारण केली होती. मार्गारेट हिने काही वर्षांच्या संसारानंतर आर्मस्ट्राँग-जोन्सशी घटस्फोट घेतला. ब्रिटिश राजघराण्यात प्रिन्सेस व्हिक्टोरिया मेलिटा हिने आपल्या पतीपासून १९०१ मध्ये घटस्फोट घेतला होता. त्यानंतर त्या राजघराण्यातील घटस्फोटाचे प्रकरण  मार्गारेटमुळे १९७८ मध्ये घ़डले. 

जर्मनीतील नातेवाइकांना विवाहाचे निमंत्रण नाहीराणी एलिझाबेथ दुसऱ्या व प्रिन्स फिलिप यांचा विवाह वादग्रस्त ठरला होता. दुसऱ्या महायुद्धात प्रिन्स फिलिप यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. त्यांच्या दोन बहिणींनी जर्मन राजघराण्यातील व्यक्तींबरोबर विवाह केले होते. त्यांचे पती नाझी पार्टीत सामील झाले होते. जर्मनीत राहणाऱ्या ब्रिटीश राजघराण्यातील  नातेवाईकांना राणी एलिझाबेथ दुसऱ्या व फिलीप यांच्या विवाहाला निमंत्रित करण्यात आले नव्हते. प्रिन्स फिलीप यांचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या वावड्याही उठल्या होत्या. प्रिन्स फिलीप यांचे खासगी सचिव माईक पार्कर यांच्या पत्नीने घटस्फोट मागितला म्हणून पार्कर यांना राजीनामा देण्यास भाग पाडले गेले. त्यावरून राजघराणे वादात अडकले होते.

प्रिन्स चार्ल्समुळे डोक्याला तापराणी एलिझाबेथ दुसऱ्या यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे वादळ म्हणजे प्रिन्स चार्ल्स व त्यांची पहिली पत्नी डायना यांचे वैवाहिक जीवन. प्रिन्स चार्ल्स यांचे लग्नाआधी कॅमिला पार्कर यांच्याशी प्रेमप्रकरण होते. १९८१ मध्ये प्रिन्स चार्ल्स व डायना यांचा विवाह झाला. त्यांना विलियम व हॅरी ही दोन मुले झाली. प्रिन्स चार्ल्स यांच्या बाहेरख्यालीपणामुळे अस्वस्थ असलेली प्रिन्सेस डायना राजघराण्याची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये म्हणून काही वर्षे गप्प बसली. परंतु नंतर प्रिन्सेस डायना १९९२ पासून चार्ल्सपासून वेगळी झाली व १९९६ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर ३१ ऑगस्ट १९९७ रोजी प्रिन्सेस डायनाचे अपघाती निधन झाले. प्रिन्स चार्ल्स व डायना यांच्या विसंवादात राणी एलिझाबेथ दुसऱ्या आपल्या मुलाचीच बाजू घेतात, असा आरोप झाला होता. या सर्व प्रकरणाचा राणी एलिझाबेथ यांना खूप मनस्ताप झाला. डायनाच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी प्रिन्स चार्ल्स व कॅमिला पार्कर यांनी ९ एप्रिल २००५ मध्ये विवाह केला.

बंड करत हॅरीने तोडले संबंध  प्रिन्स चार्ल्स व डायना यांच्या दोन मुलांपैकी हॅरी हा आईप्रमाणेच बंडखोर निघाला. त्याने २०१८ मध्ये सावळ्या रंगाची अमेरिकी अभिनेत्री मेगन मर्केल हिच्याशी विवाह केला. तिचा वर्ण राजघराण्याला कधीही आवडला नाही. तिला होणारा मुलगा सावळ्या रंगाचा निघाला, तर काय करायचे, अशी भीती राजघराण्यात होती. त्यापायी मेगनला मानसिक त्रासही दिला गेला. सरतेशेवटी मेगन मर्केल व हॅरीने २०२० मध्ये राजघराण्याचा त्याग केला. ब्रिटनचे राजघराणे वंशद्वेषी असल्याचा आरोप हॅरी व मेगन मर्केल यांनी ओप्रा विन्फ्रेला दिलेल्या मुलाखतीत केला होता. त्यामुळे ब्रिटिश राजघराण्याला काही काळ बचावाच्या पवित्र्यात जावे लागले होते. राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांच्या निधनानंतर राजे चार्ल्स तिसरे यांनी केलेल्या दूरध्वनीनुसार प्रिन्स विलियम यांनी भाऊ प्रिन्स हॅरी व त्याची पत्नी मेगन मर्केल यांना अंत्यदर्शनासाठी ब्रिटनला बोलावून घेतले होते. 

(लेखक लोकतमध्ये मुख्य उपसंपादक आहेत) 

टॅग्स :Prince Harry-Meghan Royal Weddingप्रिन्स हॅरी-मेगन शाही विवाहLondonलंडन