शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

उपद्रव करणाऱ्यांना रोखण्यासाठी, जे आवश्यक वाटेल ते करा; श्रीलंकन पंतप्रधानांचा लष्कराला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 18:40 IST

श्रीलंकेमध्ये कालपासून पुन्हा सरकारविरोधात निदर्शने सुरू झाली आहेत. यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या बातम्या आहेत.

श्रीलंकेमध्ये सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी, आता मोठ्या प्रमाणावर उपद्रव सुरूवात केला आहे. यामुळे होत असलेले नुकसान पाहता, काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून जबाबदारी पार पाडत असलेले पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे जबरदस्त संतापले आहेत. देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ​​आवश्यकता वाटेल त्या पद्धतीने उपद्रव करणाऱ्यांना रोखा, असे आदेश विक्रमसिंघे यांनी लष्कर आणि पोलिसांना दिले आहेत. 

श्रीलंकेमध्ये कालपासून पुन्हा सरकारविरोधात निदर्शने सुरू झाली आहेत. यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या बातम्या आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे, आंदोलक पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या शासकीय निवासस्थानाचे गेट तोडून आत शिरले आहेत.

रानिल विक्रमसिंघे आपल्या टेलीव्हिजनवरील भाषणादरम्यान म्हणाले, लोकशाहीवर घोंगावणारा हा फॅसिस्ट धोका आपल्याला नष्ट करायलाहवा. आम्ही सरकारी मालमत्तेचे नुकसान होऊ देणार नाही. राष्ट्रपती कार्यालय, राष्ट्रपती सचिवालय आणि पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानात योग्य प्रकारची सुरक्षा व्यवस्था बहाल व्हायला होवी. 

तसेच, "माझ्या कार्यालयातील लोक, मला काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून काम करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही त्यांना आमचे संविधान नष्ट करू देऊ शकत नाही. काही मुख्य प्रवाहातील राजकारणीही या उपद्रवी लोकांना पाठिंबा देताना दिसतात. म्हणूनच मी देशव्यापी आणीबाणी आणि कर्फ्यू जाहीर केला आहे, असेही विक्रमसिंघे यांनी म्हटले आहे.फॅसिस्ट शक्तींपासून धोका -रानिल विक्रमसिंघे म्हटले, हे आंदोलक मला आपल्या कार्यवाहक राष्ट्रपती पदाच्या कर्तव्यापासून वंचित ठेवू इच्छित आहेत. पण मी अशा फॅसिस्ट आंदोलकांना कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ देऊ शकत नाही. कुठल्याही परिस्थितीत हे थांबवायला हवे. याच बोरबर, रनिल विक्रमसिंघे म्हणाले, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, आवश्यक ती सर्व प्रकारची पावले उचलण्याचे आदेश आपण लष्करी कमांडर्स आणि पोलीस प्रमुखांना दिले आहेत. आम्ही संविधान नष्ट होऊ देऊ शकत नाही. आपली लोकशाही आबाधित राखण्यासाठी हा फॅसिस्ट धोका कोणत्याही परिस्थितीत रोखावा लागेल. कारण फॅसिझम हा आपल्यासाठी धोका आहे, असेही विक्रम सिंघे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाagitationआंदोलनprime ministerपंतप्रधानPoliceपोलिसSoldierसैनिक