शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकेने काढले २०० जणांना देशाबाहेर, अनेक भागांत अटकसत्र सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 06:16 IST

१५ दिवसांपूर्वी सुमारे ३०० निष्पापांचे बळी घेणारे ईस्टर सण्डेच्या वेळचे घातपाती बॉम्बस्फोट एका स्थानिक कट्टरपंथी इस्लामी संघटनेने घडवून आणल्याचे स्पष्ट झाल्यानंतर श्रीलंकेने देशात राहणाऱ्या सुमारे २०० विदेशी इस्लामी धर्मगुरूंना बाहेरचा रस्ता दाखविला आहे.

कोलंबो  - १५ दिवसांपूर्वी सुमारे ३०० निष्पापांचे बळी घेणारे ईस्टर सण्डेच्या वेळचे घातपाती बॉम्बस्फोट एका स्थानिक कट्टरपंथी इस्लामी संघटनेने घडवून आणल्याचे स्पष्ट झाल्यानंतर श्रीलंकेने देशात राहणाऱ्या सुमारे २०० विदेशी इस्लामी धर्मगुरूंना बाहेरचा रस्ता दाखविला आहे.श्रीलंकेचे गृहमंत्री वजिरा अभयवर्धने यांना सांगितले की, या आत्मघाती हल्ल्यांनंतर आम्ही व्हिसाचे नियम कडक करून त्यांची कठोर अंमलबजावणी सुरू केली. त्याचाच एक भाग म्हणून कायदेशीरपणे देशात आलेल्या; परंतु व्हिसाची मुदत संपूनही वास्तव्य करीत असलेल्या ६०० हून अधिक विदेशी नागरिकांना तात्काळ देशाबाहेर काढण्यात आले आहे. यात विविध देशांतून आलेल्या सुमारे २०० इस्लामी धर्मगुरूंचाही समावेश आहे. गृहमंत्र्यांनी हे लोक कोणत्या देशांचे होते हे सांगितले नाही. मात्र, पोलिसांच्या माहितीनुसार त्यात बांगलादेश, भारत, मालदीव आणि पाकिस्तानच्या नागरिकांचा समावेश आहे.अभयवर्धने म्हणाले की, श्रीलंकेत सर्वच धर्माच्या धार्मिक संस्था त्यांच्या येथे धार्मिक प्रवचने देण्यासाठी गेली अनेक वर्षे परदेशी धर्मगुरूंना बोलावत असतात. त्यांनी यायला आमची काही हरकत नाही; पण हल्ली ते प्रमाण जरा जास्तच वाढल्याचे दिसत होते. ईस्टरच्या बॉम्बहल्ल्यांनंतर आम्ही अशा मंडळींच्या वास्तव्याकडे जरा अधिक बारकाईने लक्ष देत आहोत.या हल्ल्यांनंतर श्रीलंकेत आणीबाणी लागू करण्यात आली असून, लष्कर व पोलिसांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. ते वापरून देशाच्या अनेक भागांत अजूनही धाड व अटकसत्र सुरू आहे.अजूनही धोका पूर्ण टळला नसल्याने ख्रिश्चन बांधवांनी आपापल्या घरात बसूनच प्रार्थना केली. (वृत्तसंस्था)शाळा पुन्हा सुरू होणारखबरदारीचा उपाय म्हणून गेले दोन आठवडे बंद राहिलेल्या श्रीलंकेतील शाळा सोमवारपासून कडक बंदोबस्तात पुन्हा सुरू होणार आहेत. माध्यमिक शाळा ६ मेपासून, तर प्राथमिक शाळा १३ मेपासून सुरू होतील. प्रत्येक शाळेत विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. 

टॅग्स :sri lanka bomb blastश्रीलंका बॉम्ब स्फोट