शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

अंतराळ कचऱ्यातील तुकडा पृथ्वीच्या दिशेने

By admin | Updated: October 27, 2015 23:24 IST

अंतराळ कचऱ्यातील एक मोठा तुकडा पृथ्वीवर आदळणार असून या घटनेबाबत भीतीयुक्त औत्सुक्य निर्माण झाले आहे.

वॉशिंग्टन : अंतराळ कचऱ्यातील एक मोठा तुकडा पृथ्वीवर आदळणार असून या घटनेबाबत भीतीयुक्त औत्सुक्य निर्माण झाले आहे. अपोलो अंतराळ मोहिमेच्या काळातील किंवा अलीकडील चांद्रमोहिमेदरम्यानच्या असू शकणाऱ्या या मानवनिर्मित तुकड्याचे ‘डब्ल्यूटी११९०एफ’ असे नामकरण करण्यात आले आहे. तथापि ‘डब्ल्यूचीएफ’ या टोपणनावाने तो ओळखला जातो. ‘डब्ल्यूचीएफ’ १३ नोव्हेंबरला सकाळी सहा वाजून १५ मिनिटांनी पृथ्वीवर कोसळेल, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. हा तुकडा पोकळ असून तो रॉकेटचा वापर झालेला भाग किंवा अलीकडील चांद्र मोहिमेचे ‘पॅनेलिंग शेड’ असू शकतो. भविष्यात अवकाशातून एखादी विध्वंसक वस्तू पृथ्वीवर आदळणार असेल तर काय करता येईल याची चाचणी म्हणून या घटनेचा शास्त्रज्ञ अभ्यास करीत आहेत. या तुकड्यावर हवाई विद्यापीठाच्या दुर्बिणीतून नजर ठेवली जात आहे. या तुकड्याचा व्यास एक ते दोन मीटर असून तो श्रीलंकेच्या दक्षिण टोकापासून ४० मैल अंतरावर हिंद महासागरात कोसळण्याची शक्यता आहे. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर हा तुकडा जळून जाणे अपेक्षित आहे; मात्र तसे न झाल्यास त्याचे उर्वरित अवशेष बॉम्बसारखे आदळू शकतात, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. (वृत्तसंस्था)