मिस युनिव्हर्सचा किताब दक्षिण आफ्रिकेकडे, डेमी नेल पीटर्स ठरली विजेती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 12:10 IST2017-11-27T09:18:48+5:302017-11-27T12:10:33+5:30

मिस युनिव्हर्स 2017 चा किताब दक्षिण आफ्रिकेकडे गेला आहे. डेमी नेल पीटर्सही यंदाच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेची विजेती ठरली आहे.

South Africa's Demi-Leigh Nel-Peters wins Miss Universe 2017 | मिस युनिव्हर्सचा किताब दक्षिण आफ्रिकेकडे, डेमी नेल पीटर्स ठरली विजेती

मिस युनिव्हर्सचा किताब दक्षिण आफ्रिकेकडे, डेमी नेल पीटर्स ठरली विजेती

ठळक मुद्देमिस युनिव्हर्स 2017 चा किताब दक्षिण आफ्रिकेकडे गेला आहे. डेमी नेल पीटर्सही यंदाच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेची विजेती ठरली आहे. डेमी नेल पीटर्सला 2016 ची मिस युनिव्हर्स आयरिस मिटेनायर हिने क्राऊन प्रदान केला.

लासवेगास- मिस युनिव्हर्स 2017 चा किताब दक्षिण आफ्रिकेकडे गेला आहे. डेमी नेल पीटर्सही यंदाच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेची विजेती ठरली आहे. लासवेगासमध्ये झालेल्या सोहळ्यात मिस साऊथ आफ्रिका असलेल्या डेमी नेल पीटर्सला विजेती घोषीत करण्यात आलं. डेमी नेल पीटर्सला 2016 ची मिस युनिव्हर्स आयरिस मिट्टीनेएर (फ्रान्स) हिने मानाचा मुकुट प्रदान केला. दक्षिण आफ्रिकेच्या डेमी नेल पीटर्सला मिस जमाईका डेविना बॅनेट आणि मिस कोलंबियाचं लौरा गोन्जालेज तगड आव्हान होतं. या स्पर्धेत मिस जमाईकाने तिसरं स्थान मिळवलं तर फर्स्ट रन अप मिस कोलंबिया झाली.  

मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावे करायला दुनियाभरातून 92 सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. पण अंतिम फेरीत फक्त आफ्रिका, जमाईका आणि कोलंबियाने मजल मारली.  22 वर्षीय पिटर्सने नुकतीचं बिजनेस मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे. 

आणखी वाचा: या प्रश्नांची उत्तरं देऊन भारतीय फायनलिस्ट ठरल्या विश्वसुंदरी

२६ नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय वेळेनुसार लास वेगास येथे सायंकाळी सात वाजता  (भारतीय वेळेनुसार २७ नोव्हेंबरला पहाटे साडेपाच वाजता) ही स्पर्धा सुरू झाली होती. 

मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेत  श्रद्धा शशिधरने भारताचं नेतृत्व केलं होतं. पण टॉप 10ची यादी श्रद्धाला गाठता न आल्याने भारताकडे मिस युनिव्हर्सचा किताब येण्याचं स्वप्न भंगलं.

Web Title: South Africa's Demi-Leigh Nel-Peters wins Miss Universe 2017

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.