प्रवासबंदी उठताच जनरल मुशर्रफ पाकमधून रवाना
By Admin | Updated: March 19, 2016 01:38 IST2016-03-19T01:38:16+5:302016-03-19T01:38:16+5:30
वैद्यकीय उपचारासाठी परदेशी जाण्याची मुभा मिळाल्यानंतर काही तासांतच माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ शुक्रवारी पहाटे दुबईला रवाना झाले. देशद्रोहासह अनेक खटल्यांना तोंड देत

प्रवासबंदी उठताच जनरल मुशर्रफ पाकमधून रवाना
कराची : वैद्यकीय उपचारासाठी परदेशी जाण्याची मुभा मिळाल्यानंतर काही तासांतच माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ शुक्रवारी पहाटे दुबईला रवाना झाले. देशद्रोहासह अनेक खटल्यांना तोंड देत असलेल्या मुशर्रफ यांना पाठीच्या कण्याचा त्रास आहे. ‘मी कमांडो आहे आणि माझे मातृभूमीवर प्रेम आहे. मी काही आठवड्यांत किंवा महिन्यांत परतेन’, असे मुशर्रफ देश सोडण्यापूर्वी म्हणाले.
आपल्याविरुद्धच्या सर्व खटल्यांना तोंड देण्याचा निर्धार व्यक्त करताना मुशर्रफ यांनी परतल्यानंतर आपण राजकारणात सक्रिय सहभागी होणार असल्याचेही सांगितले. आपला जुना आजार उफाळून आला असून त्यात गुंतागुंत निर्माण झाली आहे. त्यावर वैद्यकीय उपचारासाठी आपण परदेशात जात आहोत, असेही ते म्हणाले. कराचीहून पहाटे तीन वाजून ५५ मिनिटांनी (स्थानिक प्रमाणवेळ) त्यांनी दुबईला प्रयाण केले.