बाबो! गेम खेळण्यासाठी मुलाच्या हातात फोन देणं पडलं भारी; बिल भरण्याठी वडिलांना विकावी लागली कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 16:32 IST2021-06-30T16:24:48+5:302021-06-30T16:32:05+5:30
iPhone And Game : गेम खेळण्यासाठी मुलाच्या हातात अवघ्या तासाभरासाठी फोन देणं चांगलंच भारी पडलं आहे. बिल भरण्याठी वडिलांना चक्क पैशासाठी कार विकावी लागल्याची घटना समोर आली आहे.

फोटो - Triangle News
स्मार्टफोन हा हल्ली जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. मोठ्यांप्रमाणे आता चिमुकल्यांना देखील मोबाईलची सवय लागली आहे. विशेषत: गेम खेळ्यासाठी त्यांना सतत फोन हवाच असतो. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेम खेळण्यासाठी मुलाच्या हातात अवघ्या तासाभरासाठी फोन देणं चांगलंच भारी पडलं आहे. बिल भरण्याठी वडिलांना चक्क पैशासाठी कार विकावी लागल्याची घटना समोर आली आहे. ब्रिटनमधील सात वर्षाच्या मुलाच्या हातामध्ये खेळण्यासाठी आयफोन (iPhone) देणं त्याच्या वडिलांना महागात पडलं आहे.
मुलाने आयफोनवर गेम खेळता-खेळता इतकं बिल केलं की ते चुकवण्यासाठी वडिलांवर आता कार विकण्याची वेळ आली. या मुलाने खेळता-खेळता थेट 1.30 लाख रुपये बिल केल्यानंतर पालकांना याबाबत माहिती झाली. द सनने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटनमधील डॉक्टर मुहम्मद मुतासा यांचा मुलगा अशाज मुतासा हा वडिलांच्या आयफोनवर The Rise of Berk हा गेम खेळत होता. या दरम्यान त्याने एकापाठोपाठ एक अॅप विकत घेण्यास सुरुवात केली. या सर्वांचे बिल 1,800 डॉलर (जवळपास 1 लाख 3o हजार) इतके झाले. तब्बल 29 ईमेलच्या माध्यमातून त्यांना हे बिल आले. हे बिल चुकवण्यासाठी वडिलांना घरातील कार विकावी लागली.
तापमानाने मोडला रेकॉर्ड; 134 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता #HEATWAVE#heat#temperaturehttps://t.co/NxjgHbQElx
— Lokmat (@MiLOKMAT) June 30, 2021
ई-मेलवर बिल पाहिल्यावर कुटुंबियांना मोठा धक्का बसला. त्यांना सुरुवातीला सायबर क्राईमचा संशय आला. पण नंतर याबाबत माहिती मिळाल्यावर मुलाने केलेला धक्कादायक प्रकार समजला. या प्रकरणाची वडिलांनी अॅपल स्टोरकडे तक्रार केली आहे. त्या तक्रारीनंतर त्यांना 287 डॉलर परत मिळाले. मात्र या मुलाने खरेदी करण्यासाठी आयफोनमधील authentication चा टप्पा कसा पार केला याची माहिती अजून समजलेली नाही. आयफोनमधील हा टप्पा पार करण्यासाठी पासवर्ड किंवा बायो-मेट्रीकचा वापर केला जातो.
प्रेमासाठी काय पण! अभ्यासासोबत गिरवले प्रेमाचे धडे अन्...#crime#Police#teacher#Studenthttps://t.co/S1ozvYXrg4
— Lokmat (@MiLOKMAT) June 29, 2021
"मुलाने नकळत केलेल्या चुकीमुळे कंपनीने मला अक्षरश: लुटलं आहे. माझ्या मुलाला जाळ्यात ओढण्यात ते यशस्वी झाले आहेत. लहान मुलांच्या खेळावर इतका पैसा खर्च होऊ शकतो याबाबत मला माहिती नव्हती" असं मुलाच्या वडिलांनी म्हटलं आहे. मुलांच्या ऑनलाईन गेमच्या नादात मोठी रक्कम भरणं हे काही नवीन नाही. याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. कित्येकदा मुलांच्या गेमपायी आई-वडिलांना जास्तीचे पैसे भरावे लागत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
नात्याला काळीमा! ...म्हणून त्याने पत्नीची केली हत्या; सत्य समोर आल्यावर पोलीसही झाले हैराण; असा झाला उलगडा#Crime#Police#deathhttps://t.co/h3zBaKk8JL
— Lokmat (@MiLOKMAT) June 29, 2021