ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजाला केलं ठार; अमेरिका गुप्तचर यंत्रणेचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 09:49 IST2019-08-01T09:49:04+5:302019-08-01T09:49:36+5:30

अमेरिकेने हमजाचा पत्ता सांगणाऱ्याला 10 लाख डॉलर बक्षिस जाहीर केलं होतं.

Son of al-Qaeda founder Osama Bin Laden, Hamza bin Laden, has died, according to US intelligence officials | ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजाला केलं ठार; अमेरिका गुप्तचर यंत्रणेचा दावा 

ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजाला केलं ठार; अमेरिका गुप्तचर यंत्रणेचा दावा 

वॉश्गिंटन - आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अलकायदाचा संस्थापक ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनचा मारला गेल्याची माहिती आहे. अमेरिका मीडिया रिपोर्टनुसार अद्याप हमजा यांच्या मृत्युमागे अमेरिकेचा हात आहे की नाही याबाबत स्पष्ट नाही. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने हमजाचा मृत्यू कुठे झाला याची माहिती दिली नाही. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनीही याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. 

अमेरिकेने हमजाचा पत्ता सांगणाऱ्याला 10 लाख डॉलर बक्षिस जाहीर केलं होतं. वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हमजाकडून अमेरिकेवर हल्ला करण्याचं षडयंत्र रचण्यात येत होतं. त्यामुळे अमेरिकेकडून हमजाला पकडण्यासाठी बक्षिस जाहीर केलं होतं. ओसामाचा मुलगा हमजा बिन लादेन दहशतवादी संघटनेत नव्याने उभा राहणारा चेहरा होता. जिहादचा युवराज म्हणून प्रसिद्ध असलेला हमजा वारंवार आपल्या राहण्याची ठिकाणं बदलत होता. अनेक वर्षांपासून अमेरिका त्यांच्या शोधात होती. पाकिस्तान, अफगाणिस्तान, सीरिया आणि इराण अशा विविध देशात तो फिरत होता. हमजा याचा मृत्यू झाल्याची बातमी सगळीकडे सध्या आहे. अमेरिकेच्या या घोषणेनंतर सऊदी अरबने हमजा बिन लादेनची नागरिकता रद्द केली आहे. काही दिवसांपूर्वी हमजाचं लग्नही झालं होतं. 

हमजा याने ज्या मुलीशी लग्न केलं ती 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील विमान हायजॅक करणाऱ्या मोहम्मदची मुलगी आहे. अल कायदा या दहशतवादी संघटनेत हमजा बिन लादेनला मोठं पद मिळालं होतं. आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हमजा षडयंत्र रचत होता. 

मे 2011 मध्ये पाकिस्तानच्या ऐबटाबादमध्ये लपून बसलेल्या अल-कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला अमेरिकेच्या सैन्यांनी ठार केलं होतं. अमेरिकेवर 9/11 ला झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या मागे क्रूर दहशतवादी लादेनचाच हात होता. यानंतर अमेरिकेने लादेनचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. जवळपास 10 वर्षानंतर ओसामा पाकिस्तानमधील एका घरात राहत असल्याचं समोर आलं होतं. 2 मे 2011 ला ओसामा बिन लादेनचा अमेरिकेच्या लष्कराने पाकिस्तानच्या ऐबटाबाद येथील त्याच्या घरात घुसून खात्मा केला होता. हे संपूर्ण ऑपरेशन अमेरिकेच्या नेव्ही सील कमांडोंनी यशस्वीरीत्या पार पाडले होते. 
 

Web Title: Son of al-Qaeda founder Osama Bin Laden, Hamza bin Laden, has died, according to US intelligence officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.