धक्कादायक! डोळ्यांचं रुटीन चेकअप करायला गेली महिला अन् रिपोर्ट पाहून सरकली पायाखालची जमीन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 03:40 PM2021-09-24T15:40:37+5:302021-09-24T15:43:03+5:30

Shocking story of woman routine eye test uncovered brain tumour : चेकअपमध्ये महिलेला एक धक्कादायक बाब समजली आणि या गोष्टीमुळे तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं.

social viral shocking story of woman routine eye test uncovered brain tumour | धक्कादायक! डोळ्यांचं रुटीन चेकअप करायला गेली महिला अन् रिपोर्ट पाहून सरकली पायाखालची जमीन

धक्कादायक! डोळ्यांचं रुटीन चेकअप करायला गेली महिला अन् रिपोर्ट पाहून सरकली पायाखालची जमीन

Next

ब्रिटनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  एक महिला आपल्या डोळ्यांचं रुटीन चेकअप करण्यासाठी गेली होती. अनेक दिवसांपासून तिला अस्पष्ट दिसत होतं. मात्र चेकअपमध्ये तिला एक धक्कादायक बाब समजली आणि या गोष्टीमुळे तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं. रिपोर्ट पाहून महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. महिलेला आपल्याला जीवघेणा ब्रेन ट्यूमर (Brain tumor) असल्याचं समजलं. साराह कार्डवेल असं या 46 वर्षीय महिलेचं नाव असून त्यांना दोन मुलं आहेत. त्या चॅरिटी ब्रेन ट्यूमर रिसर्चसोबत काम करतात. नुकतंच त्यांनी नॅशनल आय हेल्श अवेरनेसदरम्यान आपल्याला आलेल्या अनुभवाची माहिती दिली आहे. 

अनेक दिवसांपासून स्पष्ट दिसत नसल्याने नोव्हेंबर 2018 मध्ये साराह ऑप्टिशियन्सकडे गेल्या. याआधी बरेच दिवस त्यांना चष्माही वापरला होता. मात्र काहीही फरक पडला नाही. ऑप्टिशियन्सने महिलेच्या अनेक टेस्ट केल्या मात्र ग्लास बदलूनही स्पष्ट दिसत नव्हतं. यानंतर त्यांना डोळ्यांच्या स्पेशलिस्टकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला. तिथे डोळ्यांच्या स्पेशलिस्टने साराह यांच्या डोळ्यांच्या मागील बाजूचे फोटो घेतले आणि कलर ब्लाइंडनेस टेस्ट केली. यानंतर आय स्पेशलिस्टने मला अनेक प्रश्न विचारले. तुम्ही लवकर थकता का? आणि तुम्हाला कधी काही अजब लक्षणं दिसली का? असं ते विचारू लागल्याचं साराह यांनी म्हटलं आहे. 

स्कॅनमध्ये मेंदूत ट्यूमर दिसून आला

साराह यांनी मला एनिमियासाठी काही गोळ्या दिल्या गेल्या होत्या आणि मला चक्करही यायची. प्रचंड डोकेदुखी होत असल्याने मी डॉक्टरकडे गेले होते. मात्र तेव्हा मला वाटलं होतं, की खूप जास्त काम केल्यानं असं होत आहे. यानंतर MRI स्कॅन करण्यास सांगितलं गेलं. या स्कॅनमध्ये मेंदूत ट्यूमर दिसून आला. दुसऱ्या दिवशी तिला आणखी एक MRI करण्यासाठी सांगितलं गेलं. काहीच दिवसांनी त्या न्यूरोसर्जनकडे गेल्या. तेव्हा सांगितलं गेलं की ब्रेन ट्यूमर असल्यामुळे ऑप्टिक नर्वसंबंधीच्या समस्या येत आहेत. सर्जनने साराह यांना ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. हे ऐकूनच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. 

साराह आता वर्षातून एकदा MRI स्कॅन करून घेतात

डॉक्टरांनी पाच तासाची ब्रेन सर्जरी करून ट्यूमर काढून टाकला. 22 डिसेंबरल 2018 ला तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. मात्र समस्या अजूनही कमी झालेल्या नव्हत्या. फेब्रुवारीच्या MRI स्कॅनमध्ये सगळं ठीक दिसत होतं. मात्र, जूनमध्ये MRI स्कॅनमध्ये पुन्हा एकदा ट्यूमर दिसून आला. डोळ्यांनाही त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी यासाठी पुन्हा एकदा सर्जरी केली. साराह यांनी सेरेब्रोस्पायनल फल्यूड लिक आणि सूज असल्याचं सांगितलं. तसेच मला पुन्हा एकदा रुग्णालयात जावं लागलं. यावेळी दोन सर्जरी करून लिक होणारं फल्यूड बंद केलं गेलं. हा खूपच वाईट अनुभव होता असं म्हटलं आहे. साराह आता वर्षातून एकदा MRI स्कॅन करून घेतात आणि सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Read in English

Web Title: social viral shocking story of woman routine eye test uncovered brain tumour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app