काश्मीरमध्ये परिस्थिती सुधारतेय, मानवाधिकार अहवालात अमेरिकेची कबुली; उईगर मुस्लीमांवरून चीनला फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 12:26 PM2021-03-31T12:26:42+5:302021-03-31T12:32:57+5:30

मंगळवारी बायडेन प्रशानसनाअंतर्गत अमेरिकेनं आपला पहिला मानवाधिकार अहवाल सादर केला.

situation improving in jammu kashmir says america state department in human rights report | काश्मीरमध्ये परिस्थिती सुधारतेय, मानवाधिकार अहवालात अमेरिकेची कबुली; उईगर मुस्लीमांवरून चीनला फटकारलं

काश्मीरमध्ये परिस्थिती सुधारतेय, मानवाधिकार अहवालात अमेरिकेची कबुली; उईगर मुस्लीमांवरून चीनला फटकारलं

Next
ठळक मुद्देचीनमध्ये उईगर मुस्लीमांविरोधात होत असलेल्या कारवाईला नरसंहार असं अहवालात संबोधलंकाश्मीरमध्ये परिस्थिती सुधारण्यास भारतानं पावलं उचलल्याची कबुली

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने मंगळवारी बायडेन प्रशासनात मानवाधिकारांबाबत आपला पहिला अहवाल जाहीर केला. या अहवालात जम्मू-काश्मीरमध्ये सामान्य स्थिती परत आणण्यासाठी भारतानं सतत प्रयत्न केले आहेत असं बायडेन प्रशासनानं कबुल केलं आहे. याशिवाय चीनमध्ये उईगर मुस्लीमांवर होत असलेल्या अत्याचारांवरून चीनलादेखील फटकारलं आहे.

 '2020 Country Reports on Human Rights Practices' या शीर्षकाअंतर्गत अमेरिकेनं हा अहवाल प्रकाशित केला आहे. यामध्ये चीन सरकारला शिनजियांग प्रांतात उईगर मुस्लीमांविरोधात होत असलेल्या नरसंहारासाठी जबाबदार धरणअयात आलं आहे. याशिवाय रशियाच्या सरकारवर विरोधकांवर निशाणा साधणं आणि सीरियाचे नेते बशर अल-असद यांच्यावरही आपल्या लोकांवर अत्याचार करण्याचे आरोप लावण्यात आले आहेत. 

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी हा अहवाल जारी केला. 'जम्मू काश्मीरमध्ये सामान्य स्थिती परत आणण्यासाठी भारत सरकार सातत्यानं पावलं उचलत आलं आहे. सरकारनं दूरसंचार माध्यमांवर लावण्यात आलेला निर्बंध हटवला. तसंच नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या नेत्यांनाही मुक्त केलं,' असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. जानेवारी महिन्यात भारत सरकारनं इंटरनेटवर काही प्रमाणात लादलेले निर्बंध मागे घेतले होते.

चीनला फटकारलं

दुसरीकडे, अहवालात चीनबरोबर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने चीनच्या झिनजियांग प्रांतामधील मुस्लिम उईगर मुस्लिम आणि जातीय व धार्मिक अल्पसंख्यक समुहाविरोधात चीनच्या कारवाईस 'नरसंहार' म्हणून घोषित केलं. "शिनजियांग प्रांतात २०२० मध्ये मुख्यत: उईगर मुस्लिम आणि इतर जातीय व धार्मिक अल्पसंख्यक गटांविरूद्ध झालेला नरसंहारा हा मानवतेविरूद्धचा गुन्हा होता, असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं अहवलात म्हटलं आहे. 

Web Title: situation improving in jammu kashmir says america state department in human rights report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.