शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

अमेझॉनच्या जंगलात ऑनलाइन पॉर्नचा चस्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 09:13 IST

International News: या आदिवासी जमातीचे चारचौघात वागण्याचे नियम, रीतिभाती पारंपरिक असून, ते नियम कुणी मोडत नाही. स्त्रीपुरुषांनी चारचौघांत जवळीक किंवा चुंबन हे तर निषिद्ध मानलं जातं. त्याच जमातीतले तरुण पॉर्न कंटेट शेअर करू लागले याची मोठी चिंता वडीलधाऱ्यांना वाटू लागली.

हातात स्मार्ट फोन आले आणि माणसं आळशी झाली. वाढत्या वयातली मुलं, तरुण मुलं तर एक सेकंद स्मार्ट फोन हातावेगळा ठेवत नाहीत. वडीलधाऱ्यांचं बोलणंच त्यांना ऐकू येत नाही. सतत सोशल मीडियात असतात. पॉर्न कंटेट पाहतात आणि शेअर करतात. त्याची चटक लागल्याने व्यक्तिगत आयुष्यात ते लैंगिक संबंधांच्या भलभलत्या कल्पना घेऊन जगतात आणि आपल्या जोडीदाराकडून तशीच अपेक्षा करत आक्रमक होतात.

 - हे सारं वाचून कुणालाही वाटेल की यात नवीन काय आहे, हे चालू वर्तमानकाळात कुठल्याही समाजाचं चित्र आहे. पण, वर नमूद केलेल्या या समस्या शहरी किंवा नागर समाजाच्या नाहीत. ब्राझीलमधल्या अमेझॉनच्या जंगलात खूप आत आत घनदाट अरण्यात राहणाऱ्या आणि अजूनही बऱ्यापैकी आदिम आयुष्यच जगणाऱ्या मारुबाे नावाच्या आदिवासी जमातीचं हे चित्र आहे. अमेझॉनच्या जंगलात आता ते फक्त २००० लोक आहेत आणि त्यांच्यासमोर नवीन संकट उभं राहिलं ते म्हणजे इंटरनेटचं. इलॉन मस्कच्या स्टारलिंक या सेवेनं नऊ महिन्यांपूर्वी अमेझॉनच्या जंगलामध्ये अत्यंत दुर्गम भागात इंटरनेट पोहोचवलं. नेहमीच्या इंटरनेट सेवांपेक्षा वेगळी, पृथ्वीभोवती लगतच्या कक्षेतून फिरणारे सॅटेलाइट उपग्रह वापरून दुर्गम भागात इंटरनेट सेवा पोहोचविण्याचे काम हा उपक्रम करतो. मारुबो नावाच्या आदिवासींपर्यंत ही सेवा पोहोचली तेव्हा त्यांनाही विलक्षण आनंद झाला होता. त्यांच्यासाठी एकदम नवीन जग खुलं झालं. भरपूर माहिती, जगात लोक कुठं कुठं राहतात, जग किती मोठं आहे, कोणकोणती कामं नागरी समाजात केली जातात, कोणत्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत, मदत कुठं मिळू शकते अशी सगळी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली. अर्थातच तिथं सगळ्यांना आनंद झाला.

पण, हळूहळू वडीलधारी माणसं मात्र या इंटरनेटवर आणि हातात स्मार्टफोन घेऊन बसणाऱ्या तरुण मुलांवर चिडू लागली. एकाएकी या मुलांना कमी ऐकायला यायला लागलं की ते मोठ्यांकडे दुर्लक्ष करतात हेच कळेना. ही मुलं रोजची नेमून दिलेली कामं करीत नव्हती. सतत मोबाइल पाहू लागली. आळशी झाली. एकाच जागी बसून राहू लागली. आणि नंतर लक्षात आलं की या मुलांना तर सोशल मीडिया पाहण्याचं आणि त्याचबरोबर पोर्न कंटेट पाहण्याचं व्यसन लागलं आहे. ते इतके ॲडिक्ट झाले की जरा कुणी त्यांना काही बोललं की ते चिडचिड करू लागले. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या आदिवासी जमातीचे चारचौघात वागण्याचे नियम, रीतिभाती पारंपरिक असून, ते नियम कुणी मोडत नाही. स्त्रीपुरुषांनी चारचौघांत जवळीक किंवा चुंबन हे तर निषिद्ध मानलं जातं. त्याच जमातीतले तरुण पॉर्न कंटेट शेअर करू लागले याची मोठी चिंता वडीलधाऱ्यांना वाटू लागली.

या जमातीतल्या ७३ वर्षांच्या आजी साइनाम मारुबो सांगतात, इंटरनेट आलं तेव्हा आम्हाला फार छान वाटलं होतं. पण, आता वाटतंय की सगळंच हाताबाहेर गेलं. आमची तरुण मुलं प्रचंड आळशी झाली आहेत. त्या व्हिडीओतले गोरे लोक जसे वागतात तसं ही वागू लागली आहेत. त्यांच्याकडून आता इंटरनेट काढून घेता येत नाही, ते पूर्णच बंद करावं असं आता मलाही वाटत नाही. पण, आळशीपणाचं मात्र काहीतरी करावं लागेल!’

पॉर्न कंटेट आणि सोशल मीडियातलं स्क्रोलिंग ही एकच समस्या नाही तर आता त्यांना बाहेरच्या जगातले घोटाळे, हिंसाचार, अफवा आणि काही चुकीची अशास्त्रीय माहितीही कळू लागली आहे. त्यातून त्यांच्या लैंगिक अपेक्षाही बदलल्या आणि आता ते अधिक आक्रमक होत जोडीदाराला त्रासही देऊ लागले आहेत. हे सारं नियंत्रणात आणायचं म्हणून जमातीच्या म्होरक्यांनी निर्णय घेतला की इंटरनेट वापराच्या वेळा ठरविल्या जातील. म्हणून मग आता सकाळी दोन तास आणि सायंकाळी पाच तास अशी इंटरनेट सेवा सुरू असते. रविवारी मात्र पूर्ण दिवस सुरू असते. बाकी काळात बंद. त्याचा काही उपयोग झाला किंवा त्याला तरुण मुलांनी संमती दर्शविली की नाही हे कळू शकलं नाही, पण तूर्त तरी असा नियम लागू करण्यात आलेला आहे.

निसर्गाच्या अगदी जवळ राहून अजूनही आदिम चालीरीतींप्रमाणं जगणारी ही आदिवासी माणसं इंटरनेट आल्यानं मात्र आता हैराण आहेत की नेमकं एवढ्या माहितीचं आपण करायचं काय ?

नदीकाठची साधी माणसंइटूई नदीकाठी या जमातीचे लोक लांब लांब जंगलात, लहानशा पारंपरिक झोपड्यात राहतात. महिला मुख्यत्वे स्वयंपाक करतात आणि मुलं सांभाळतात. पुरुष कष्टाची कामं करतात. केळी आणि मॅनिओकची लागवड, शिकार, ही कामं पुरुषांची.  निर्णय घेताना महिलांचा सल्ला घेतला जातो, निर्णय प्रक्रियेत त्या सहभागी असतात. त्यांच्या निसर्गस्नेही जगण्यात इंटरनेट आलं आणि चित्र बदलायला लागलं.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय