आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 00:34 IST2025-07-16T00:33:48+5:302025-07-16T00:34:53+5:30

China Taiwan War News : चीनच्या या कृतीनंतर तैवाननेही प्रत्युत्तर देण्याची तयारी दर्शविली आहे

Signs of a new war in Asia as 21 Chinese fighter jets spotted in Taiwan airspace | आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी

आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी

मध्य पूर्व आणि युरोपनंतर आता आशियात एका नवीन युद्धाचे संकेत मिळत आहेत. या युद्धाचे कारण चीन असेल असे बोलले जात आहे. तैवान ताब्यात घेण्यासाठी चीनने आपली मोहीम वेगवान केली आहे. मंगळवारी तैवानच्या आकाशात एक-दोन नव्हे तर तब्बल २१ चिनी लढाऊ विमाने दिसली. चीनच्या या कृतीनंतर तैवाननेही प्रत्युत्तर देण्याची तयारी दर्शविली आहे.

दक्षिण चीन समुद्रात आपले वर्चस्व वाढवण्यासाठी चीन कधीही तैवानवर हल्ला करू शकतो. यासाठी ड्रॅगन सतत तैवानमध्ये घुसखोरी करत आहे. मंगळवारी चिनी लढाऊ विमानांनी तैवानच्या सीमेत घुसखोरी केली आणि एका कारखान्यात स्फोट घडवून आणला. हा स्फोट कसा झाला हे स्पष्ट झालेले नाही. पण यात चीनचा हात असल्याचा तैवानचा आरोप आहे.

तैवानसाठी हळूहळू चीन बनतोय धोका

चीन तैवानसाठी एक मोठा धोका बनत आहे. राष्ट्राध्यक्ष लाई चिंग-ते यांना यातून मार्ग काढणे कठीण होत आहे. याचे एक कारण ट्रम्प यांचे धोरण आहे. हे धोरण तैवानच्या सुरक्षेची हमी कमकुवत करते. कारण, ट्रम्प यांची भूमिका केवळ शस्त्रास्त्र पुरवठादाराची बनली आहे. याचा फायदा घेत चीनने आक्रमक भूमिका स्वीकारली आहे.

२६ लढाऊ विमानांनी उड्डाणे, २१ विमानांनी घुसखोरी

मंगळवारी चिनी विमानांनी घुसखोरी केली. आधी २६ चिनी लढाऊ विमाने तैवानभोवती उडताना दिसली. याशिवाय, चिनी नौदलाची ७ जहाजे देखील त्याच भागात गस्त घालत होती. तैवानने मध्य रेषेजवळ चीनची १ विमानवाहू नौका देखील पाहिली गेली. अखेर २१ लढाऊ विमानांनी तैवानच्या उत्तर, नैऋत्य आणि पूर्व सीमेचे उल्लंघन केले आणि घुसखोरी केली. यानंतर, तैवानचे सैन्य सक्रिय झाले. तैवानच्या सैन्याने केवळ सीमावर्ती भागात कूच केली नाही तर, चीनविरुद्ध संरक्षणाचा सराव देखील सुरू केला.

तैवानच्या कारखान्यात स्फोट

चिनी घुसखोरीदरम्यान तैवानमधील काओशुंग येथील बेटावरील पहिल्या मोठ्या बॅटरी प्लांटमध्ये स्फोट झाला. या कारखान्यात लिथियम बॅटरी तयार केल्या जात होत्या, म्हणून हा मोठा घातपात मानला जातो. चीनकडून काही हालचाली सुरू झाल्याचा संशय आहे. यानंतर तैवानमध्ये युद्धसराव सुरू केला आहे. पण अमेरिका या युद्धसरावात सहभागी नाही.

Web Title: Signs of a new war in Asia as 21 Chinese fighter jets spotted in Taiwan airspace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.