धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 18:51 IST2025-07-26T18:48:44+5:302025-07-26T18:51:41+5:30
Tea App Hacked: गेल्या काही काळात डेटिंग ॲपच्या माध्यमातून मित्रमैत्रिणी शोधण्याचं प्रमाणा वाढलं आहे. मात्र अशा ॲपचा वापर करणं बऱ्याचदा धोकादायकही ठरू शकतं. अशीच घटना अमेरिकेत घडली आहे.

धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
गेल्या काही काळात डेटिंग ॲपच्या माध्यमातून मित्रमैत्रिणी शोधण्याचं प्रमाणा वाढलं आहे. मात्र अशा ॲपचा वापर करणं बऱ्याचदा धोकादायकही ठरू शकतं. अशीच घटना अमेरिकेत घडली आहे. अमेरिकेतील Tea App हे डेटिंग ॲप हॅक करून त्यावरून महिलांचे हजारो फोटो चोरण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.समोर येत असलेल्या माहितीनुसार 4Chan नावाच्या एका युझर प्लॅटफॉर्मने हे ॲप हॅक केले आहे. Tea App ॲपवर बहबुतांश महिलांनी आपली प्रोफाइल प्रायव्हेट ठेवलेली आहे. त्यांच्याच प्रायव्हसीला सुरुंग लावत हे फोटो हॅक केले गेले आहेत. सुमारे ७२ हजार युझर आयडी हॅक करण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रायव्हेट डेटा धोक्यात सापडला आहे.
या घटनेबाबत टी ॲपच्या प्रवक्त्याने सांगितले की, प्राथमिक तपासामध्ये हॅकर्सनी जुन्या स्टोरेज सिस्टिमला हॅक केल्याचे समोर आले आहे. यामधील काही फोटो हे फेब्रुवारी २०२४ पूर्वी ॲपवर अपलोड करण्यात आले होते. हॅकर्सनी जे फोटो चोरले आहेत त्यामध्ये १३ हजार सेल्फी आणि फोटो आयडींचा समावेश आहे. हे फोटो युझर्सनीं आपली ओळख सिद्ध करण्यासाठी या ॲपवर अपलोड केलेले होते. याशिवाय टी ॲपवर खुल्या असणाऱ्या पोस्ट, कमेंट्स आणि मेसेजमधून हे फोटो घेण्यात आले असेही त्यांनी सांगितले.
मात्र या हॅकर्सनां कुठल्याही युझरचा ईमेल ॲड्रेस किंवा फोन नंबर मिळाला नाही. म्हणजेच त्यांची ती माहिती सुरक्षित राहिली आहे. या प्लॅटफॉर्मवर १६ लाखांहून अधिक महिला आहेत. त्या येथे प्रायव्हेट पद्धतीने डेटिंग अनुभव आमि सल्ला शेअर करू शकतात. हे अॅप महिलांना एकमेकांसोबत जोडून घेण्याची आणि एकमेकांना मदत करण्याची संधी देते. या ॲपने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
दरम्यान, टी ॲपवरून चोरण्यात आलेल्या काही आयडींचे फोटो 4Chan नावाच्या वेबसाईटवर पोस्ट करण्यात आले आहेत. हे ॲप महिलांविरोधी विचार बाळगणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रसिद्ध आहे. इथून कायम दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली जाते.