Shocking! New hanta virus arrives in China after coronavirus; one death record hrb | कोरोनानंतर चीनमध्ये 'हंता' व्हायरसने एकाचा मृत्यू; जाणून घ्या, या विषाणूचा धोका अन् सर्व काही

कोरोनानंतर चीनमध्ये 'हंता' व्हायरसने एकाचा मृत्यू; जाणून घ्या, या विषाणूचा धोका अन् सर्व काही

बिजिंग : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून चीनमध्ये कोरानाग्रस्तांची संख्या आटोक्यात आली आहे. या व्हायरसला जन्माला घालणाऱ्या चीनमध्ये लोक सुटकेचा नि:श्वास सोडत नाहीत तोच आता नवीन व्हायरसने डोके वर काढल्याने चीनची झोपच उडाली आहे. 


कोरोना व्हायरसचा सर्वाधिक मोठा फटका पहिला चीनलाच बसला होता. या देशात साडे तीन हजार बळी गेले आहेत. मात्र, नंतर इटलीने चीनला मागे टाकले. असे असले तरीही गेल्या आठवड्यापासून वुहानमध्ये नव्या रुग्णांची संख्या कमी झाली होती. तसेच उपचार घेऊनही हजारो रुग्ण घरी गेले होते. मात्र, आता पुन्हा चीनची डोकेदुखी वाढली आहे. 


कोरोनाने थैमान घातलेल्या युन्नान प्रांतामध्ये एका व्यक्तीचा सोमवारी नव्या व्हायरसमुळे मृत्यू झाला. कोरोना कमी झाल्यामुळे हा व्यक्ती शाडोंग प्रांतातून रोजगारासाठी बसने येत होता. या नव्या व्हायरसचे नाव हंता असून त्यांला या व्हायरसची लागण झाल्याचे उघड झाले. यामुळे त्यांच्यासोबत बसमध्ये प्रवास करत असलेल्या ३२ लोकांचीही तपासणी करण्यात आली आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने याची माहिती दिल्यानंतर सोशल मीडियावर भूकंप झाला आहे. 


अनेकांनी मोठ्या संख्येने ट्विट करत कोरोना सारखी भीती व्यक्त केली आहे. हा व्हायरस कोरोनासारखाच मोठा झाला तर सर्वनाश होईल. जर चीनच्या लोकांनी जनावरांना खाणे बंद केले नाही तर हे होतच राहणार आहे, असेही काहींनी म्हटले आहे.

 
हंता व्हायरस काय आहे? 
कोरोना व्हायरससारखा हंता व्हायरस घातक नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण कोरोनासारखा हा हवेद्वारे पसरत नाही. हा व्हायरस उंदीर, खार यांच्या संपर्कात आल्यास होतो. उंदरांनी घरात आतबाहेर केल्यास हा व्हायरस पसरतो. जर कोणी निरोगी असेल आणि तो जर हंता व्हायरसच्या संपर्कात आला तर त्याला लागण होते, असे सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने म्हटले आहे. हंता व्हायरस जीवघेणा आहे. याची लागण झाल्यास मृत्यूची शक्यता ३८ टक्क्यांनी वाढते. ताप, डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी, उलटी, डायरिया आदी लक्षणे दिसून येतात.

मोदींनी 6 वर्षांत जेवढे 'कमावले', तेवढे महिनाभरात गमावले

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी शरद पवार आले धावून; पासवानांकडे केली 'ही' विनंती

कोरोनाचा दहावा रुग्ण सापडल्यानंतर कसा वाढला आकडा; हा चार्ट पाहून बसेल धक्का

Read in English

Web Title: Shocking! New hanta virus arrives in China after coronavirus; one death record hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.