शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

धक्कादायक! Pfizer लस घेतल्यानंतर हेल्थ वर्करचा मृत्यू, फिनलँड-बल्गेरियामध्ये साइड इफेक्ट्ची प्रकरणे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2021 10:06 AM

Portuguese health worker dies after getting Pfizer vaccine: ब्रिटननंतर फिनलँड आणि बल्गेरियातील अमेरिकन कंपनी फायझरच्या कोरोना लसीचे दुष्परिणाम झाल्याचेही समोर आले आहेत.

ठळक मुद्देसोनिया या पोर्तो शहरातील पोर्तुगाल इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कोलॉजी (Portuguese Institute of Oncology) येथे कार्यरत होत्या.

लिस्बन : पोर्तुगालमध्ये कोरोनावरील फायझर (Pfizer) लस घेतल्यानंतर 48 तासांच्या आत एका आरोग्य कर्मचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सोनिया असेवेडो ( Sonia Acevedo) असे या  41 वर्षीय महिलेचे नाव असून फायझर लसीचा डोस घेतल्यानंतर कोणतेही दुष्परिणाम झाले नाहीत. मात्र, त्यांचा अचानक मृत्यू झाला. सध्या सोनिया यांचे शवविच्छेदन केले असून मृत्यूचे कारण शोधण्यात येत आहे. दरम्यान, ब्रिटननंतर फिनलँड आणि बल्गेरियातील अमेरिकन कंपनी फायझरच्या कोरोना लसीचे दुष्परिणाम झाल्याचेही समोर आले आहेत.

डेली मेलच्या वृत्तानुसार, सोनिया या पोर्तो शहरातील पोर्तुगाल इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कोलॉजी (Portuguese Institute of Oncology) येथे कार्यरत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना कोणताही गंभीर आजार किंवा साइड इफेक्ट्स झाले नाहीत आणि त्या निरोगी होत्या असे सांगण्यात येत आहे. सोनिया ठीक होत्या. त्यांना आरोग्यसंबंधी कोणतीही समस्या नव्हती. तसेच, त्यांना कोविडची लक्षणे नव्हती. एक दिवस आधी त्यांना कोरोनाची लस देण्यात आली होती, असे सोनिया यांचे वडील अबिलियो असेवेडो यांनी पोर्तुगीज डेली वृत्तपत्राला सांगितले. तसेच, सोनिया यांचा मृत्यू कशामुळे झाला याचे मला उत्तर हवे आहे, असेही अबिलियो असेवेडो म्हणाले.

पोर्तुगाल इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कोलॉजीने असे निवेदन प्रसिद्ध केले आहे की, 30 डिसेंबर रोजी सोनिया यांना लस देण्यात आली होती आणि 1 जानेवारीला त्यांचा अचानक मृत्यू झाला. सोनिया यांच्या तब्येतीत लस घेतल्यानंतर दुष्परिणाम दिसले नाहीत. मृत्यूचे कारण शोधण्यात येत आहे, परंतु सोनिया यांच्या हेल्थ रेकॉर्डनुसार त्यांची तब्येत ठीक होती. 

दुसरीकडे, फिनलँडनंतर बुल्गारियामध्ये अमेरिकन कंपनी फायझरच्या कोरोना लसीचे दुष्परिणाम झाल्याचे समोर आले आहे. ड्रग्ज एजन्सीचे कार्यकारी संचालक बॉग्डन किरिलोव्ह यांनी सोमवारी सांगितले की, या लसीचे दुष्परिणाम 4 लोकांमध्ये दिसून आले. ज्या लोकांमध्ये लसीचे दुष्परिणाम दिसून आले त्यापैकी दोघांमध्ये वेदना झाल्याचे आढळले आणि दोघांना सुस्ती व त्यांच्या तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले.

यापूर्वी फिनलँडमध्येही पाच लोकांमध्ये गंभीर दुष्परिणाम दिसले. जागतिक आरोग्य संघटनेने जगभरात आपत्कालीनच्या वापरासाठी फायझरला मान्यताही दिली आहे. ब्रिटनमध्ये दोन आरोग्य कर्मचार्‍यांनाही या लसीचे दुष्परिणाम होण्याची तीव्र लक्षणे दिसली. यानंतर, फायझरने जगभरात अॅलर्जी असलेल्या रूग्णांसाठी कोरोना लस वापरण्यासंबंधी माहितीही जारी केली होती. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याfinlandफिनलंडPortugalपोर्तुगाल