शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

Shocking! बापाने प्रेयसीसाठी आपल्या दोन मुलांना १५व्या मजल्यावरून खाली फेकलं आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 12:58 IST

एका रहिवाशी भागातील इमारतीच्या १५व्या मजल्यावरून दोन भाऊ-बहीण खाली पडताना दिसले होते. १५व्या मजल्यावरून पडून दोघांचाही वेदनादायी मृत्यू झाला होता. 

चीनच्या (China) एका वडिलांनी फारच संतापजनक आणि अमानवीय कृत्य (Murder) केलं आहे. या हत्याकांडामुळे चीनच्या सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. व्यक्तीने आपल्या प्रेयसीसाठी स्वत:च्या दोन लेकरांचा जीव (Father Murdered Two Child) घेतला. दोन नोव्हेंबर २०२०  ला एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात एका रहिवाशी भागातील इमारतीच्या १५व्या मजल्यावरून दोन भाऊ-बहीण खाली पडताना दिसले होते. १५व्या मजल्यावरून पडून दोघांचाही वेदनादायी मृत्यू झाला होता. 

मुलांना बघण्यासााठी वडील धावत धावत बिल्डींगच्या खाली आले होते. दोघांच्याही प्रेतांजवळ वडील जोरजोरात रडत होता. लोकांना वाटलं की, दोन्ही मुलं अपघाताने खाली पडले असतील. मात्र, आता याचा खुलासा झाला आहे की, ही दर्घटना नव्हती. दोन्ही मुलं चुकून खाली पडले नाही तर त्यांना वरून फेकण्यात (Father Throw two child from building) आलं होतं. वडील आणि त्याच्या गर्लफ्रेन्डने दोन्ही मुलांना मारण्यासाठी १५व्या मजल्यावरून फेकण्याचा प्लॅन केला होता. मुलांच्या वडिलांचं नाव झांग आहे. (हे पण वाचा : धक्कादायक! आपल्या मुलीचे लाड कमी होतील; कन्यारत्न झाले म्हणून नणंदेने जावेला जिवंत जाळले )

पोलिसांच्या तपासातून समोर आलं की, हत्या करण्याचा उद्देश आणखी भयानक आणि हैराण करणारा आहे. क्रूर वडिलाने आपल्या प्रेयसीला खूश करण्यासाठी असं केलं. त्याने प्रेयसीसोबत मिळून मुलांना मारण्याचा प्लॅन केला. जेणेकरून त्याला तिच्यासोबत लग्न करता येईल. तपासानंतर पोलिसांनी वडील आणि त्याच्या प्रेयसीला अटक केली आहे. 

पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं  की, झांग आणि चेनने २०१७ मध्ये लग्न केलं. त्यानंतर त्यांना २०१८ आणि २०१९ मध्ये एक मुलगी आणि एक मुलगा झाला. एप्रिल २०१९ मध्ये झांगने चेनकडून घटस्फोटासाठी अर्ज केला. कारण त्याचं दुसऱ्या महिलेसोबत अफेअर होतं. (हे पण वाचा : दुसरे लग्न करून पती पोहचला पोलीस ठाण्यात, पहिल्या पत्नीने धू धू धरले अन् व्हिडिओ झाला व्हायरल)

झांगने प्रेयसीकडून हे लपवलं होतं की, त्याचं लग्न झालं आहे. ऑगस्टमध्ये झांग आणि त्याची प्रेयसी सोबत राहू लागले. पण २०१९ च्या शेवटी प्रेयसीला माहिती पडलं की, झांगला दोन मुलेही आहेत. तरी तिने त्याच्यासोबत संबंध कायम ठेवले. तिकडे २६ फेब्रुवारी २०२० ला झांग आणि चेनने सहमतीने घटस्फोट घेतला. सोबतच असा करार झाला की, झांग सहा वर्षे मुलांचा सांभाळ करणार. पण यावरून झांगची प्रेयसी नाराज होती.

यामुळे वाद झाल्याने दोघेही काही दिवसांसाठी वेगळे झाले होते. मात्र, नंतर प्रेयसीसाठी झांगने आपल्या दोन्ही मुलांना बिल्डींगच्या १५व्या मजल्यावरून खाली फेकलं. यात दोघांचाही मृत्यू झाला. यात त्याला प्रेयसीनेही साथ दिली. पोलिसांनी सांगितलं की, दोघेही अनेक दिवसांपासून मुलांची हत्या करण्याचा प्रयत्न करत होते. 

टॅग्स :chinaचीनCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू