Shocking case! In North Korea, the bodies of prisoners are made fertilizer; Absconding prisoner's claim pda | धक्कादायक प्रकार! उत्तर कोरियात कैद्यांच्या मृतदेहाचे खत बनवितात; फरार कैद्याचा दावा

धक्कादायक प्रकार! उत्तर कोरियात कैद्यांच्या मृतदेहाचे खत बनवितात; फरार कैद्याचा दावा

ठळक मुद्देहुकूमशहा किम जोंग उत्तर कोरियामधील लोकांवर क्रौर्याची मर्यादा ओलांडत आहेत. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीमुळे संपूर्ण जग संतप्त आहे. कारण उत्तर कोरियाने गेल्या एका महिन्यात चार चाचण्या घेतल्या आहेत.

उत्तर कोरियाकडून एक खळबळजनक बातमी उघडकीस आली आहे. हृदय विदारक अशी ही बातमी आहे उत्तर कोरियाच्या एका माजी कैद्याने असा दावा केला आहे की, उत्तर कोरियामध्ये राजकीय कैद्यांच्या मृतदेहातून खत तयार करून सैन्याच्या सैनिकांसाठी पिके घेतली जात आहेत.

किम इल सून यांनी म्हणाले की, टेकड्यांमध्ये पिके पिकत नाहीत, त्यावेळी एकाने सल्ला दिला की, मृत कैद्यांना मृतदेहातून खत केले तर पिके चांगली येण्यास सुरू होईल, त्यानंतर परंपरा सुरू झाली. चांगली शेती झाल्याने तेव्हापासून कैद्यांना ठार मारून त्यांचे मृतदेहापासून खत बनवले जाऊ लागले.


उत्तर कोरिया आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व बाजूंनी वेगळा झाला असताना या कैद्याचे हे विधान समोर आले आहे. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीमुळे संपूर्ण जग संतप्त आहे. कारण उत्तर कोरियाने गेल्या एका महिन्यात चार चाचण्या घेतल्या आहेत.

किम इल सून म्हणाले की, केचियॉन कॅम्पच्या आसपासची जमीन खूप सुपीक झाली आहे. कारण मृतदेहाचे खत बनवून शेतात टाकण्यात आले. हे खत नैसर्गिक खत म्हणून काम करीत आहेत. किम इल सून यांनी सांगितले की, उत्तर कोरियाच्या सैनिकांना मृतदेह किती अंतरावर आणि दफन करावा याचे प्रशिक्षणही दिले जात आहे. यामुळे मृतदेहाचे खत बनविण्यात येईल आणि पिक घेण्यास फायदा होईल.


ग्रेग स्कार्लेटिओ म्हणाले की, हुकूमशहा किम जोंग उत्तर कोरियामधील लोकांवर क्रौर्याची मर्यादा ओलांडत आहेत. त्यांच्या राजकीय कैद्यांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याऐवजी  खत बनवित आहेत. हे अत्यंत निंदनीय आहे. किम इल सून यांनी दक्षिण कोरियाची राजधानी सियोल येथे मानवाधिकार समितीला (एचआरएनके) याबाबत माहिती दिली.


केचियॉन कॅम्प राजधानी प्योंगयांगच्या उत्तरेस सुमारे 80 किलोमीटर अंतरावर आहे. येथे सुमारे 6000 कैदी आहेत. असे म्हटले जाते की किरकोळ गुन्ह्यातील कैद्यांना येथे पाठविले जाते, परंतु येथे होत असलेल्या क्रौर्याबद्दल धक्कादायक दावेही केेेले आहेत.

 

 

Web Title: Shocking case! In North Korea, the bodies of prisoners are made fertilizer; Absconding prisoner's claim pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.