Shocking! नॉर्वेतील सरकारी टीव्ही चॅनेलवर दाखवण्यात आल्या सेक्‍सच्या 60 पद्धती, उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 02:53 PM2021-06-20T14:53:43+5:302021-06-20T14:58:51+5:30

यासाठी सेक्‍सोलॉजिस्‍ट, डॉक्‍टर्स आणि थेरपिस्‍ट लोकांची मदत घेण्यात आली आहे. एनआरकेच्या वेबसाइटवर ब्‍लॅक अँड व्हाइट फोटोंसह सेक्‍स करण्याच्या पद्धती पोस्ट करण्यात आल्या आहेत.

Shocking 60 methods of sex shown on Norwegian government TV channel | Shocking! नॉर्वेतील सरकारी टीव्ही चॅनेलवर दाखवण्यात आल्या सेक्‍सच्या 60 पद्धती, उडाली खळबळ

Shocking! नॉर्वेतील सरकारी टीव्ही चॅनेलवर दाखवण्यात आल्या सेक्‍सच्या 60 पद्धती, उडाली खळबळ

googlenewsNext

 

ओस्‍लो - नॉर्वेतील सरकाररी टीव्ही चॅनेलवर थेट सेक्‍स करण्याच्या पद्धतीच शिकविण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नॉर्वेतील सरकारी टीव्ही चॅनेल एनआरकेने वेगवेगळ्या पद्धतीने सेक्‍स करण्याच्या 60 पद्धती सांगितल्या आहेत. यांत समलैंगिक कपल आणि हेट्रोसेक्‍सुअल कपलचाही समावेश आहे. या गाइडमध्ये  बॅक पेनचा सामना करत असलेले लोक अथवा गर्भवती महिलांनाही सेक्‍स करण्याची पद्धत सांगण्यात आली आहे. (Shocking 60 methods of sex shown on Norwegian government TV channel)

यासाठी सेक्‍सोलॉजिस्‍ट, डॉक्‍टर्स आणि थेरपिस्‍ट लोकांची मदत घेण्यात आली आहे. एनआरकेच्या वेबसाइटवर ब्‍लॅक अँड व्हाइट फोटोंसह सेक्‍स करण्याच्या पद्धती पोस्ट करण्यात आल्या आहेत.  एनआरकेने म्हटले आहे, की फोटोत दर्शवण्यात आलेले कपल्स प्रत्यक्ष जिवनातही एकत्रित राहतात. तसेच हे कपल्स फोटोत केवळ पोझ देत आहेत. 

बॉडिबिल्डरनं केलं सेक्स डॉलसोबत लग्न; आता खऱ्या लग्नाची तयारी, पण अट एकच...

अत्यंत आक्रमक गाइड -
हा कार्यक्रम दाखविण्यात आल्यानंतर, आतापर्यंत किमान 97 तक्रारी आल्या आहेत. एक सार्वजनिक टीव्ही चॅनल असल्याने सेक्‍स सारख्या मुद्द्यांवर एनआरकेने निष्‍पक्ष रहायला हवे. असे यातील अनेक लोकांचे म्हणणे आहे. तसेच इतर काही लोकांनी हे सेक्‍स गाइडला अत्यंत आक्रामक असल्याचे म्हटले आहे. वादात सापडलेले सेक्‍स गाइडचे संपादक रेइडर क्रिस्टिइंसेन यांनी म्हटले आहे, की 'आम्ही अगदी योग्य पद्धतीने सर्व बाबींचे आकलन केले आहे. त्यामुळे हे बदलण्याचा आमचा कुठलाही  इरादा नाही, असा आम्हाला विश्वास आहे.

Sexual Health : सेक्स लाईफ आनंदी आणि निकोप हवं? मग फक्त 'हे' गैरसमज मनातून काढून टाका

रेइडर म्हणाले, 'हे गाइड तयार करताना आम्ही 20 तज्ज्ञांशी चर्चा केली आहे. हे सेक्‍स गाइड अत्यंत उपयुक्त आणि महत्वाचे आहे,' असे अनेकांचे म्हणणे आहे. तसेच, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक आपले समर्थनही देत आहेत. केवळ पाच दिवसांत आतापर्यंत 8,50,000 लोकांनी हे सेक्‍स गाइड ऑनलाइन पाहिली आहे. त्यांच्या या निवेदनानंतरही लोकांचा विरोध सुरूच आहे.

Web Title: Shocking 60 methods of sex shown on Norwegian government TV channel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.