धक्कादायक...! पाकिस्तानात 10 वी नापास बनले पायलट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 19:16 IST2018-12-29T19:16:02+5:302018-12-29T19:16:38+5:30
सर्वोच्च न्यायालयात एका प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.

धक्कादायक...! पाकिस्तानात 10 वी नापास बनले पायलट
लाहोर : पाकिस्तानामध्ये खोटी प्रमाणपत्रे सादर करून विमानाचे पायलट झाल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे हे उमेदवार दहावी नापास होते. सरकारी विमानसेवापाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्समध्ये हे पाच जण भरती करण्यात आले. यावर तेथील सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी करताना त्यांची बस चालविण्याचीही लायकी नसल्याचे म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयात एका प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. यावेळी तेथील विमानतळ प्राधिकरणाने ही माहिती दिली. यामध्य़े त्यांनी सांगितले की, पदव्यांची पडताळणी करण्यासाठी विद्यापीठ सहकार्य करत नाही. यामुळे अनेकजण खोटी पदवी प्रमाणपत्रे सादर करतात. आता पर्यंत 50हून अधिक कर्मचाऱ्यांनी त्यांची प्रमाणपत्रे व संबंधित माहिती न सादर केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे, असेही अधिकाऱ्याने न्यायालयात सांगितले.
यावर न्यायालयाने प्राधिकरणावर ताशेरे ओढताना म्हटले की, प्राधिकरण पायलट आणि केबिन क्रू व अन्य कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड देण्य़ास नेहमीच वेळ लावते. तुम्ही अशा लोकांच्या हातात विमान सोपवले ज्यांना साधी बस चालविता येणार नाही. असे करून प्राधिकरणाने कित्येक प्रवाशांचे जीव धोक्याच घातले आहेत.