Shivon Zilis Elon Musk: डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एलन मस्क यांच्यासोबत एक महिला दिसली. ही महिला सातत्याने मस्क यांच्यासोबत वावरत असल्यानंतर तिची चर्चा सुरू झाली. या महिलेचे नाव आहे शिवोन जिलिस!
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एलन मस्क जेफ बेजोस आणि त्यांच्या पत्नी लॉरेन सांचेज, इवान्का ट्रम्प आणि जेरेड कुश्नर यांना भेटले. त्यावेळी शिवोन जिलिस या त्यांच्यासोबतच होत्या. त्यामुळेच त्यांचे नाव जास्त चर्चेत आले.
कोण आहेत शिवोन जिलिस?
३८ वर्षीय शिवोन जिलिस या कॅनडातील ओटारियाच्या रहिवासी आहेत आणि येल विद्यापीठाच्या पदवीधारक आहेत. त्यांची आई पंजाबी होती, तर वडील कॅनडाचे नागरिक. शिवोन जिलिस या एलन मस्क यांच्या न्युरालिंक कंपनीत संचालक म्हणून कार्यरत आहेत. ओपन एआयच्या सल्लागारही त्या आहेत.
एलन मस्क यांच्यासोबत शिवोन जिलिस यांचं नात काय?
शिवोन जिलिस आणि एलन मस्क यांचं नात खूप खासगी राहिलेलं आहे. २०२१ मध्ये दोघांना जुळी मुले झाली. २०२४ मध्ये दोघांना तिसरे मुल झाले.