शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

इथिओपियातील विमान दुर्घटनेत भारतीय महिला अधिकाऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 15:30 IST

पर्यावरण मंत्रालयातील संयुक्त राष्ट्रांच्या सल्लागार शीखा गर्ग यांचाही इथिओपियातील विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मृतांमध्ये गर्ग यांचा समावेश असल्याची माहिती दिली.

ठळक मुद्देपर्यावरण मंत्रालयातील संयुक्त राष्ट्रांच्या सल्लागार शीखा गर्ग यांचाही इथिओपियातील विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मृतांमध्ये गर्ग यांचा समावेश असल्याची माहिती दिली.विमान कोसळून तब्बल 157 प्रवाशांचा मृत्यू झाला.

नैरोबी - इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथून नैरोबीला निघालेले इथिओपियन एअरलाइन्सचे विमान अपघातग्रस्त झाल्याची घटना रविवारी (10 मार्च) समोर आली आहे. या विमानातून 149 प्रवासी आणि 8 कर्मचारी प्रवास करत होते. विमान कोसळून तब्बल 157 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार भारतीय प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

पर्यावरण मंत्रालयातील संयुक्त राष्ट्रांच्या सल्लागार शीखा गर्ग यांचाही इथिओपियातील विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मृतांमध्ये गर्ग यांचा समावेश असल्याची माहिती दिली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना त्यांनी मदत जाहीर केली आहे. सुषमा स्वराज यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे.

इथिओपिया एअरलाइन्सचे हे विमान स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजून 38 मिनिटांनी आदिस अबाबा येथून नैरोबीकडे रवाना झाले होते. दरम्यान, उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच विमानाशी असलेला संपर्क तुटला. दरम्यान, अपघातग्रस्तांसाठी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. आदिस अबाबापासून 60 किमी अंतरावर असलेल्या बिशोफ्टू येथे हा अपघात झाला आहे. ज्या विमानाला अपघात झाला आहे ते 737-800 मॅक्स प्रकारातील होते. दरम्यान, इथिओपियाच्या पंतप्रधानांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. 

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी विमान दुर्घटनेतील मृतांची नावेही प्रसिद्ध केली आहेत. यामध्ये वैद्य पन्नागर भास्कर, वैद्य हासिन अन्नागेश, नुकारवारपू मनीषा आणि शिखा गर्ग यांचा समावेश आहे. या मृतांच्या कुटुंबियांना सर्वप्रकारची मदत करण्याचे आदेश इथिओपियातील भारतीय उच्चायुक्तांना देण्यात आले आहेत.

'मी वैद्य यांच्या टोरंटोतील मुलाशी फोनवरुन चर्चा केली. मात्र, त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबातील 6 व्यक्तींना गमावल्याचे कळताच आपल्याला खूपच दुःख झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच इथिओपिया आणि केनयातील भारतीय दुतावासाशी संवाद साधत त्यांना सर्व प्रकारची मदत करण्यास सांगितले आहे' अशी माहिती स्वराज यांनी दिली आहे.

इथिओपिया एअरलाइन्सच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इथिओपिया एअरलाइन्सच्या या विमानातून जागतिक स्तरावरील एकूण 30 देशांचे प्रवासी प्रवास करत होते. या प्रवाशांमध्ये केनियाचे 32, कॅनडाचे 18, इथोपियाचे 9, इटली, चीन आणि अमेरिकेचे 8, ब्रिटन व फ्रेंचचे 7, इजिप्त 6, डच 5, भारत व स्लोवाकियाचे 4, ऑस्ट्रेलिया, स्वीडन आणि रशियाचे 3, मोरोकन्स, स्पॅनार्ड्स, पोल आणि इस्राइलचे 2 प्रवासी प्रवास करत होते. तर बेल्जियम, इंडोनेशिया, सोमालिया, नॉर्वे, सर्बिया, टोगो, मोझाम्बिया, रवांडा, सुदान, युगांडा आणि येमेन देशाचे काही नागरिक देखील या विमानातून प्रवास करत होते.

 

टॅग्स :airplaneविमानDeathमृत्यूIndiaभारत