सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 22:24 IST2025-07-31T22:22:42+5:302025-07-31T22:24:21+5:30
Relationship: या प्रियकराने सदर तरुणीला सात वर्षांच्या काळात तब्बल ४२ वेळा प्रपोज केलं होतं. मात्र त्याच्या प्रेयसीने त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही, मात्र या हट्टी प्रियकरानेही जिद्द सोडली नाही. अखेरीस...

सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
प्रेमात नकार मिळणं हे काही प्रियकरांसाठी नवं नाही. अनेकदा पहिला नकार हा होकारच समजून आपल्या प्रेयसीला राजी करण्यासाठी आणखी प्रयत्न करणाऱ्यांची संख्याही या जगात काही कमी नाही. अनेकांना दोन तीन प्रयत्नांनंतर यश मिळतं. मात्र काही जण सतत नकार मिळाल्यानंतर आपले प्रयत्न सोडून देतात. मात्र एका प्रियकराने आपला प्रेम प्रस्ताव स्वीकारण्यासाठी सलग ४३ वेळा एकाच प्रेयसीला प्रपोज केल्याची अजब घटना समोर आली आहे. या प्रियकराने सदर तरुणीला सात वर्षांच्या काळात तब्बल ४२ वेळा प्रपोज केलं होतं. मात्र त्याच्या प्रेयसीने त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही, मात्र या हट्टी प्रियकरानेही जिद्द सोडली नाही. अखेरीस या प्रियकराने जेव्हा ४३ व्या वेळी तिला प्रपोज केल तेव्हा ती नकार देऊ शकली नाही. या अजब प्रेमप्रकरणाची आता एकच चर्चा होत आहे.
ही प्रेमकहाणी आता इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही प्रेमकहाणी आहे ती युनायटेड किंग्डममधील ल्युक विंट्रिप आणि त्याची गर्लफ्रेंड सारा यांची. ल्युक एक टॅटू आर्टिस्ट आहे. तर सारा एक मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आहे. दोघेही एकमेकांवर प्रेम करतात. मात्र लग्नाच्या प्रश्नावरून त्यांचं घोडं अडलं. नात्याला सहा महिने झाल्यानंतर ल्युकने साराला लग्नासाठी गळ घालण्यास सुरुवात केली. मात्र ल्युकने जेव्हा जेव्हा लग्नासाठी मागणी धातली तेव्हा तेव्हा साराने नकार दिला. असं करत करत ल्युक याने सारा हिला तब्बल ४२ वेळा लग्नासाठी प्रपोज केलं. मात्र प्रत्येक वेळी त्याला नकारच मिळाला.
लग्नासाठीचे सुमारे ४२ प्रस्ताव नाकारल्यानंतर साराने ल्युकला अखेर ४३ व्या वेळी होकार दिला. त्याचं कारण सांगताना सारा म्हणाली की ल्युक याने नेहमी प्रेम व्यक्त केलं. कधी मला होकार देण्यासाठी भाग पाडलं नाही. त्यामुळे मी ४३ व्या वेळी त्याचा प्रेमाचा प्रस्ताव स्वीकार केला, असे तिने सांगितले.
४२ व्या वेळी लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर सारा हिने पुढच्या वेळी योग्य वेळ असेल तर मी होकार देईन, असे सांगितले होते. मात्र ही योग्य वेळ येण्यासाठी २०२३ हे साल उजाडावे लागले. त्यानंतर ल्युक हा सारा हिला लंडनमधील ग्रिनिज येथे घेऊन गेला. तिथे त्याने तिला प्रपोज केले आणि सारा हिनेही यावेळी कुठलेही आढेवेढे न घेता लग्नाला होकार दिला.