शहरं
Join us  
Trending Stories
1
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
2
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
3
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
5
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
6
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
7
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
8
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
10
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
13
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
14
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
15
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
16
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
17
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
18
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
19
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
20
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 12:15 IST

Shahbaz Sharif Diwali Blessing: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दिवाळी २०२५ च्या निमित्ताने जगभरातील हिंदू समुदायाला शुभेच्छा संदेश दिला. 'प्रत्येक नागरिकाने शांततेत राहावे,' असे आवाहन.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दिवाळी २०२५ च्या निमित्ताने पाकिस्तानसह जगभरातील हिंदू समुदायाला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या अधिकृत 'X' (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून त्यांनी एक लांबलचक संदेश पोस्ट करून सर्व नागरिकांनी शांततेत राहावे, असे आवाहन केले आहे. शाहबाज शरीफ यांच्या या बदललेल्या सुरांनी जगालाच नाही तर कट्टर पाकिस्तानींनाही अचंबित केले आहे. 

शाहबाज शरीफ यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, "या दिवाळीला आपण सर्वानी एकत्र येऊन हे सुनिश्चित केले पाहिजे की प्रत्येक नागरिक, तो कोणत्याही धर्माचा किंवा पार्श्वभूमीचा असो, शांततेने राहू शकेल आणि देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देऊ शकेल." 

दोन भूमिकांचे उदाहरण? एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान भारतासह हिंदू धर्मीयांविरोधात अनेकदा कठोर वक्तव्ये करतात, तर दुसरीकडे ते पाकिस्तानमधील अल्पसंख्याक हिंदू समाजाला सण-उत्सवाच्या शुभेच्छा देत आहेत. याबद्दल राजकीय वर्तुळात दोन भूमिकांचे उदाहरण म्हणून चर्चा सुरू आहे. पाकिस्तानात हिंदूंवर आजही अत्याचार होत आहेत. शरीफ यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देताना पाकिस्तानी हिंदूंना दिल्या, तसेच जगभरातील हिंदूंनाही शुभेच्छा म्हटले परंतू भारताचे नाव मात्र घेतलेले नाही.  

पंतप्रधान शरीफ यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे पाकिस्तानमधील कट्टरपंथीयांनी शाहबाज यांना हे देखील हिंदूंपैकीच एक आहे, आता जाऊन भारतीयांना सॅल्यूट ठोकून या, असे म्हटले आहे. तर एकाने एवढा आनंद तर ईदलाही झाला नसेल, जेवढी हे दिवाळी साजरी करत आहेत, अशा शब्दांत टीका केली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan's Tone Shifts? PM Greets Hindus on Diwali, Skips India

Web Summary : Pakistani PM Shahbaz Sharif wished Hindus worldwide a happy Diwali, emphasizing peace and progress. This contrasts with past anti-Hindu rhetoric, sparking debate. Critics question the sincerity, noting continued persecution of Pakistani Hindus, and the exclusion of India in his greeting.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानDiwaliदिवाळी २०२५