पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दिवाळी २०२५ च्या निमित्ताने पाकिस्तानसह जगभरातील हिंदू समुदायाला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या अधिकृत 'X' (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून त्यांनी एक लांबलचक संदेश पोस्ट करून सर्व नागरिकांनी शांततेत राहावे, असे आवाहन केले आहे. शाहबाज शरीफ यांच्या या बदललेल्या सुरांनी जगालाच नाही तर कट्टर पाकिस्तानींनाही अचंबित केले आहे.
शाहबाज शरीफ यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, "या दिवाळीला आपण सर्वानी एकत्र येऊन हे सुनिश्चित केले पाहिजे की प्रत्येक नागरिक, तो कोणत्याही धर्माचा किंवा पार्श्वभूमीचा असो, शांततेने राहू शकेल आणि देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देऊ शकेल."
दोन भूमिकांचे उदाहरण? एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान भारतासह हिंदू धर्मीयांविरोधात अनेकदा कठोर वक्तव्ये करतात, तर दुसरीकडे ते पाकिस्तानमधील अल्पसंख्याक हिंदू समाजाला सण-उत्सवाच्या शुभेच्छा देत आहेत. याबद्दल राजकीय वर्तुळात दोन भूमिकांचे उदाहरण म्हणून चर्चा सुरू आहे. पाकिस्तानात हिंदूंवर आजही अत्याचार होत आहेत. शरीफ यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देताना पाकिस्तानी हिंदूंना दिल्या, तसेच जगभरातील हिंदूंनाही शुभेच्छा म्हटले परंतू भारताचे नाव मात्र घेतलेले नाही.
पंतप्रधान शरीफ यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे पाकिस्तानमधील कट्टरपंथीयांनी शाहबाज यांना हे देखील हिंदूंपैकीच एक आहे, आता जाऊन भारतीयांना सॅल्यूट ठोकून या, असे म्हटले आहे. तर एकाने एवढा आनंद तर ईदलाही झाला नसेल, जेवढी हे दिवाळी साजरी करत आहेत, अशा शब्दांत टीका केली आहे.
Web Summary : Pakistani PM Shahbaz Sharif wished Hindus worldwide a happy Diwali, emphasizing peace and progress. This contrasts with past anti-Hindu rhetoric, sparking debate. Critics question the sincerity, noting continued persecution of Pakistani Hindus, and the exclusion of India in his greeting.
Web Summary : पाकिस्तानी पीएम शहबाज शरीफ ने शांति और प्रगति पर जोर देते हुए दुनिया भर के हिंदुओं को दिवाली की शुभकामनाएं दीं। यह पिछली हिंदू विरोधी बयानबाजी के विपरीत है, जिससे बहस छिड़ गई। आलोचकों ने पाकिस्तानी हिंदुओं के उत्पीड़न और भारत को शामिल न करने पर सवाल उठाया।