पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 12:15 IST2025-10-20T11:58:32+5:302025-10-20T12:15:25+5:30
Shahbaz Sharif Diwali Blessing: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दिवाळी २०२५ च्या निमित्ताने जगभरातील हिंदू समुदायाला शुभेच्छा संदेश दिला. 'प्रत्येक नागरिकाने शांततेत राहावे,' असे आवाहन.

पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दिवाळी २०२५ च्या निमित्ताने पाकिस्तानसह जगभरातील हिंदू समुदायाला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या अधिकृत 'X' (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून त्यांनी एक लांबलचक संदेश पोस्ट करून सर्व नागरिकांनी शांततेत राहावे, असे आवाहन केले आहे. शाहबाज शरीफ यांच्या या बदललेल्या सुरांनी जगालाच नाही तर कट्टर पाकिस्तानींनाही अचंबित केले आहे.
शाहबाज शरीफ यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, "या दिवाळीला आपण सर्वानी एकत्र येऊन हे सुनिश्चित केले पाहिजे की प्रत्येक नागरिक, तो कोणत्याही धर्माचा किंवा पार्श्वभूमीचा असो, शांततेने राहू शकेल आणि देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देऊ शकेल."
दोन भूमिकांचे उदाहरण? एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान भारतासह हिंदू धर्मीयांविरोधात अनेकदा कठोर वक्तव्ये करतात, तर दुसरीकडे ते पाकिस्तानमधील अल्पसंख्याक हिंदू समाजाला सण-उत्सवाच्या शुभेच्छा देत आहेत. याबद्दल राजकीय वर्तुळात दोन भूमिकांचे उदाहरण म्हणून चर्चा सुरू आहे. पाकिस्तानात हिंदूंवर आजही अत्याचार होत आहेत. शरीफ यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देताना पाकिस्तानी हिंदूंना दिल्या, तसेच जगभरातील हिंदूंनाही शुभेच्छा म्हटले परंतू भारताचे नाव मात्र घेतलेले नाही.
On the auspicious occasion of Diwali, I extend my heartfelt greetings to our Hindu community in Pakistan and around the world.
— Shehbaz Sharif (@CMShehbaz) October 20, 2025
As homes and hearts are illuminated with the light of Diwali, may this festival dispel darkness, foster harmony, and guide us all toward a future of…
पंतप्रधान शरीफ यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे पाकिस्तानमधील कट्टरपंथीयांनी शाहबाज यांना हे देखील हिंदूंपैकीच एक आहे, आता जाऊन भारतीयांना सॅल्यूट ठोकून या, असे म्हटले आहे. तर एकाने एवढा आनंद तर ईदलाही झाला नसेल, जेवढी हे दिवाळी साजरी करत आहेत, अशा शब्दांत टीका केली आहे.