शहबाज-मुनीर अमेरिकेची नुसती 'लाळ' घोटत बसले; ट्रम्प यांनी मोठा दणका दिला; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 17:36 IST2026-01-29T17:36:25+5:302026-01-29T17:36:56+5:30

...गेल्या काही महिन्यांपासून ट्रम्प यांच्याशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला हा एक मोठा दणका मानला जात आहे.

Shahbaz-Munir just sat there taking America's saliva Trump gave a big blow; What exactly happened? | शहबाज-मुनीर अमेरिकेची नुसती 'लाळ' घोटत बसले; ट्रम्प यांनी मोठा दणका दिला; नेमकं काय घडलं?

शहबाज-मुनीर अमेरिकेची नुसती 'लाळ' घोटत बसले; ट्रम्प यांनी मोठा दणका दिला; नेमकं काय घडलं?


अमेरिकेने पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानसंदर्भात आपल्या नागरिकांसाठी अत्यंत कडक सूचना जारी केल्या आहेत. ट्रम्प प्रशासनाने नवीन 'ट्रॅव्हल ॲडव्हायजरी' जारी करत अमेरिकन नागरिकांना पाकिस्तानात जाण्यापूर्वी दोन वेळा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ट्रम्प यांच्याशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला हा एक मोठा दणका मानला जात आहे.

पाकिस्तानला धक्का -
गेल्या काही घडामोडी बघता, आपण ट्रम्प यांच्या जवळचे आहोत, अशी पाकिस्तानची धारणा झाली होती. पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी ट्रम्प सत्तेत आल्यापासून दोन वेळा अमेरिका दौरा केला. तर पंतप्रधान शहबाज शरीफही आंतरराष्ट्रीय पातळीवर ट्रम्प यांच्या सुरात सूर मिसळताना दिसतात. एवढेच नाही तर, गाझा शांततेसाठी बनवलेल्या ट्रम्प यांच्या 'बोर्ड ऑफ पीस'मध्येही पाकिस्तानने सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, असे सर्व असतानाही अमेरिकेने पाकिस्तानला असुरक्षित देशांच्या 'लेव्हल ३' श्रेणीत ठेवले आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने २६ जानेवारी रोजी ही ॲडव्हायजरी अद्ययावत केली. पाकिस्तानमध्ये कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय दहशतवादी हल्ले होऊ शकतात, त्यामुळे तो उच्च जोखमीचा देश असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. बस स्थानके, हॉटेल, बाजारपेठा, लष्करी तळ, विमानतळ, शाळा, रुग्णालये आणि धार्मिक स्थळांजवळ सर्वाधिक धोका असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. विशेषतः खैबर पख्तूनख्वा भागाला 'लेव्हल ४' श्रेणीत ठेवण्यात आले असून, तिथे हत्या आणि अपहरणाच्या घटनांमुळे जाण्यास पूर्णतः मनाई करण्यात आली आहे.

भारत कोणत्या श्रेणीत? -
दुसरीकडे, अमेरिकेने भारताला 'लेव्हल २' श्रेणीत ठेवले असून, तिथे केवळ सतर्क राहून प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे. केवळ पाकिस्तान सीमेजवळील भागातत खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.

Web Title: Shahbaz-Munir just sat there taking America's saliva Trump gave a big blow; What exactly happened?