शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

व्हाईट हाऊसमध्ये खोदकाम चालू, डोनाल्ड ट्रम्प का तयार करतायत हायटेक 'बंकर'; अण्वस्त्र हल्ल्यापासूनही होणार रक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 11:26 IST

Trump Iran War Update : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बुलेटप्रूफ आणि ड्रोन-प्रूफ बॉलरूम तयार करण्यास सुरुवात केली आहे. १००० लोकांसाठी राहण्याची सोय असलेल्या या 'सुपर बंकर'ची खास वैशिष्ट्ये वाचा.

पश्चिम आशियातील इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. इराणकडून अमेरिकेवर संभाव्य हल्ल्याची भीती वर्तवली जात असताना, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सुरक्षेसाठी व्हाईट हाऊसमध्ये एका अत्यंत सुरक्षित अशा 'अंडरग्राउंड सेफ हाऊस' ची निर्मिती केल्याचे वृत्त समोर येत आहे.

हे बंकर व्हाईट हाऊसच्या ईस्ट विंगमध्ये बनवण्यात येत असून ते अत्याधुनिक सुविधांनी सज्ज आहे. हे केवळ एक सुरक्षित ठिकाण नसून, अण्वस्त्र हल्ला किंवा रासायनिक हल्ल्याच्या वेळीही राष्ट्राध्यक्षांना पूर्ण सुरक्षा प्रदान करेल अशा पद्धतीने याचे डिझाइन करण्यात आले आहे. याला 'प्रेसिडेंशियल इमर्जन्सी ऑपरेशन्स सेंटर'च्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे.

बंकरची गरज का भासली?इराणने नुकतेच अमेरिकन तळांवर ड्रोन आणि मिसाइल हल्ले केले आहेत. प्रत्युत्तर म्हणून ट्रम्प यांनीही आक्रमक भूमिका घेतल्याने युद्धाचा धोका वाढला आहे. युद्धजन्य परिस्थितीत राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या मुख्य टीमला सुरक्षित ठिकाणाहून कारभार चालवता यावा, यासाठी हे बंकर तयार करण्यात आले आहे. या बंकरमधून ट्रम्प अमेरिकन लष्कराला थेट आदेश देऊ शकतात आणि जगातील घडामोडींवर लक्ष ठेवू शकतात.

युद्ध की चर्चा?एकीकडे ट्रम्प इराणसोबत पडद्यामागून चर्चा करत असल्याचे सांगत असले, तरी दुसरीकडे व्हाईट हाऊसमध्ये सुरू असलेल्या या मोठ्या सुरक्षा तयारीमुळे अमेरिका कोणत्याही मोठ्या संघर्षासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे.खर्च खाजगी देणगीतून, सरकारी तिजोरीला भार नाहीया प्रकल्पावरून अमेरिकेत राजकीय आणि कायदेशीर वाद निर्माण झाला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना ट्रम्प म्हणाले की, या 'सेफ हाऊस'साठी लागणारा सर्व खर्च खाजगी देणगीदारांकडून उभा केला जात असून, यात सरकारी पैसा वापरला जाणार नाही. हा प्रकल्प निर्धारित वेळेच्या आधी आणि कमी बजेटमध्ये पूर्ण होईल, असा दावाही त्यांनी केला आहे.१००० लोकांसाठी राहण्याची सोय

व्हाईट हाऊसच्या खाली बनत असलेल्या या लष्करी संकुलात एकाच वेळी १००० लोक राहू शकतील. येथे केवळ राष्ट्राध्यक्षांची सुरक्षाच नाही, तर टॉप लेव्हल लष्करी बैठका आणि मोठे समारंभ आयोजित करण्याची सोय असेल. या 'मिलिट्री फॅसिलिटी'बद्दलची अधिक माहिती गोपनीय ठेवण्यात आली असून, २०२८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Building High-Tech Bunker in White House Amid Iran Tensions

Web Summary : Amidst US-Iran tensions, Trump is reportedly building a high-tech, secure underground bunker at the White House, funded by private donations. It will protect against nuclear and chemical attacks and accommodate 1000 people, facilitating military operations and meetings. Completion is expected by 2028.
टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प