अफगाण सीमेवर आत्मघातकी हल्ल्यात सात पाकिस्तानी सैनिक ठार, दोन्ही देशांमध्ये तणाव कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 15:06 IST2025-10-17T14:42:22+5:302025-10-17T15:06:47+5:30
अफगाण सीमेजवळ झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात सात पाकिस्तानी सैनिक ठार झाले, असा दावा पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी केला.

अफगाण सीमेवर आत्मघातकी हल्ल्यात सात पाकिस्तानी सैनिक ठार, दोन्ही देशांमध्ये तणाव कायम
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर पुन्हा तणाव सुरू झाला आहे. या संघर्षादरम्यान दोन्ही बाजूंनी मोठे नुकसान झाले. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ल्यांचे आरोप केले. दरम्यान, अफगाण सीमेजवळ झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात सात पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे.
करणी सेनेत अध्यक्ष, ३ वर्षात मंत्रिपद... वाचा रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबाची स्पेशल कहाणी
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले की अफगाण सीमेजवळ झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात सात पाकिस्तानी सैनिक ठार झाले. या महिन्यात दोन्ही देशांमधील अनेक दिवसांच्या भीषण संघर्षानंतर युद्धबंदीची परिस्थिती नाजूक असताना पाकिस्तानने ही कबुली दिली आहे.
दोन्ही देशांनी दावे केले
दोन्ही देशांमधील संघर्षानंतर, पाकिस्तानी सैन्याने विविध ठिकाणी ४० हल्लेखोरांना ठार मारल्याचा दावा केला. दरम्यान, अफगाण तालिबानी सैन्याने पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान केल्याचा दावा केला आहे, त्यांनी असंख्य चौक्या, शस्त्रे आणि रणगाडे ताब्यात घेतले आहेत. संघर्षादरम्यान अनेक पाकिस्तानी लष्करी प्रतिष्ठाने उद्ध्वस्त झाली.
युद्धविरामची घोषणा
सौदी अरेबिया आणि कतार यांच्या मध्यस्थीनंतर युद्धविरामची घोषणा झाली. पण अजूनही दोन्ही देशांमध्ये तणाव कायम आहे. पाकिस्तानने अफगाण तालिबान प्रशासनाने पाकिस्तानमध्ये हल्ले वाढवणाऱ्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे दहशतवाद्यांचा अफगाणिस्तानातील सुरक्षित आश्रयस्थानांमधून कारवाया होत असल्याचा पाकिस्तानचा दावा आहे.