ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 13:32 IST2025-12-16T13:31:40+5:302025-12-16T13:32:13+5:30
कार्नेंगी सायन्सच्या सीस्मोलॉजिस्ट विलियम फ्रेजर आणि येल यूनिवर्सिटीच्या जेफ्री पार्क यांनी ३९६ भूकंपातून निघणाऱ्या तरंगाचा अभ्यास केला

ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
बर्म्युडा ट्रॅंगलच्या रहस्यमय कथा अनेकांना माहिती असतील. ज्याठिकाणी जहाज अन् प्लेन अचानक गायब होते. परंतु आता वैज्ञानिकांनी बर्म्युडा बेटाखाली एक रहस्य शोधलं आहे. या बेटाच्या कवचाच्या खाली (पृथ्वीचा वरचा थर) २० किमी जाडीचा खडकाचा थर आहे जो आजूबाजूच्या खडकांपेक्षा कमी घनता असलेला आहे. हा थर बेटाला तराफ्याप्रमाणे उंच धरून ठेवतो असा थर पृथ्वीवर इतरत्र कुठेही दिसला नाही असं एका नवीन अभ्यासातून असे दिसून आले आहे.
वैज्ञानिक शोध कसा लागला?
कार्नेंगी सायन्सच्या सीस्मोलॉजिस्ट विलियम फ्रेजर आणि येल यूनिवर्सिटीच्या जेफ्री पार्क यांनी ३९६ भूकंपातून निघणाऱ्या तरंगाचा अभ्यास केला. या लहरी पृथ्वीच्या आतमधून प्रवास करतात वेगवेगळ्या घनतेच्या थरांवर थांबतात किंवा विचलित होतात. बर्म्युडावरील भूकंप केंद्रातील डेटा वापरून संशोधकांनी बेटाच्या खाली ५० किलोमीटरपर्यंत एक चित्र तयार केले. सामान्यत: आवरण महासागरीय कवचाच्या खाली सुरू होते. बर्म्युडा कवच आणि आवरण यांच्यामध्ये एक अतिरिक्त थर असतो. हा थर सभोवतालच्या कवचापेक्षा सुमारे १.५% कमी घनतेचा असतो म्हणून तो हलका असतो आणि बेटाला उंच धरून ठेवतो.
वैज्ञानिक कारण काय?
बर्म्युडा हे ज्वालामुखी बेट आहे परंतु तिथे गेल्या ३ कोटीहून अधिक वर्षांहून ज्वालामुखी सक्रिय नाही. साधारणपणे जेव्हा ज्वालामुखी थांबतो तेव्हा त्याचे कवच थंड होते आणि ढासळते. परंतु बर्म्युडा बुडालेला नाही, तो समुद्रसपाटीपासून ५०० मीटर उंचीवर आहे. गेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान हा थर तयार झाला होता. आवरणातील गरम खडक कवचात घुसले आणि तेथे घट्ट झाले. याला अंडरप्लेटिंग म्हणतात. हा थर कमी दाट असल्याने बेट तरंगत असल्याचे दिसते असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. हा अभ्यास जिओफिजिकल रिसर्च लेटर्स या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. हे पृथ्वीवर अद्वितीय आहे. आता तेथे असाच थर अस्तित्वात आहे का हे पाहण्यासाठी आम्ही इतर बेटांचा शोध घेऊ असं फ्रेजर यांनी म्हटलं.
बर्म्युडा ट्रॅंगलचं रहस्य काय?
बर्म्युडा ट्रॅंगलला डेविल्स ट्रँगलही म्हटले जाते. याठिकाणी रहस्यमय रित्या ५० हून अधिक जहाजे आणि २० हून अधिक विमाने बेपत्ता झाली आहेत. काही जण यामागे खराब वातावरण, वेगवान वारे, मानवी चूक मानतात परंतु काही जण याला आजही रहस्यमय घटना मानत आहेत.