शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

शरीराच्या कोणकोणत्या भागांना प्रभावित करतो कोरोना? वैज्ञानिकांनी केले हैराण करणारे खुलासे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 23:53 IST

विज्ञानिकांनी म्हटले आहे, की या मॉडेलच्या माध्यमाने अध्ययनादरम्यान दिसून आले, की कोरोना व्हायरस मल्टी-ऑर्गन मेटाबॉलिक डिसीज आहे. याचा अर्थ हा आजार शरीरातील बहुतांश भागांना प्रभावित करतो.

ठळक मुद्देकोरोना व्हायरसच्या संक्रमणाची माहिती मिळवण्यासाठी वैज्ञानिकांनी एक विशेष मेटाबॉलिक मॉडेल तयार केले आहे.मॉडेलच्या माध्यमाने अध्ययनादरम्यान दिसून आले, की कोरोना व्हायरस मल्टी-ऑर्गन मेटाबॉलिक डिसीज आहे.कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतर केवळ श्वसनासंदर्भातीलच नाही, तर मेटाबॉलिक म्हणजे, चयापचयासंदर्भातील समस्याही समोर येऊ लागल्या आहेत.

मेलबर्न - कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची माहिती मिळवण्यासाठी वैज्ञानिकांनी एक विशेष मेटाबॉलिक मॉडेल तयार केले आहे. याच्या सहाय्याने, व्हायरसने शरीराच्या कोणकोणत्या भागांना प्रभावित केले आहे, याचा अंदाज लावला जाऊ शकतो. विज्ञानिकांनी म्हटले आहे, की या मॉडेलच्या माध्यमाने अध्ययनादरम्यान दिसून आले, की कोरोना व्हायरस मल्टी-ऑर्गन मेटाबॉलिक डिसीज आहे. याचा अर्थ हा आजार शरीरातील बहुतांश भागांना प्रभावित करतो.

वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतर केवळ श्वसनासंदर्भातीलच नाही, तर मेटाबॉलिक म्हणजे, चयापचयासंदर्भातील समस्याही समोर येऊ लागल्या आहेत.

प्लाझ्मा नमुन्यांपासून काढला निष्कर्ष -या अध्ययनासाठी ऑस्ट्रेलियातील मर्डोक विद्यापीठ आणि ब्रिटनच्या केम्ब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या एका समूहाचे प्लाझ्मा नमूने एकत्र केले आणि ते स्वस्थ लोकांच्या समूहाच्या प्लाझ्मा नुमुन्यांशी जुळवून पाहिले, याचा उद्देश दोन्ही समूहांतील नमून्यांत नेमका काय मेटाबॉलिक फरक आहे, हे पाहणे होता. 

संपूर्ण शरीराची केमेस्ट्रीच बदलते -संशोधकांनी सांगितले, की या नमुन्यांतून अनेक अजारांचे बायोलॉजिकल फिंगरप्रिंट दिसून आले आहेत. यात लिव्हर खराब होणे, डायबेटीज आणि कोरोनरी हार्ट डिसीजच्या धोक्याचाही समावेश आहे. संशोधकांनी सांगितले, की जे लोक सार्स सीओवी-2 व्हायरसने संक्रमित होते, त्यांच्यात या आजारांचा दीर्घकाळ प्रभाव जाणवला. ते म्हणाले, जेव्हा एखाद्या व्यक्तीला संक्रमक आजार होतो. तेव्हा काही काळासाठी हे बायोलॉजिकल फिंगरप्रिंट्स त्याच्या संपूर्ण शरीराची केमेस्ट्रीच बदलून टाकतात. याचा परिणाम शरीराच्या अनेक अवयवांवर दिसून येतो.

फुफ्फुसासह लिव्हरवरही परिणाम -मर्डोक युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक, जेरेमी निकोल्सन यांनी म्हटले आहे, की 'कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतर त्याचा परिणाम शरीराच्या अनेक अवयवांवर होतो, हे या संशोधनातून समोर येते. यासाठीही हे संशोधन महत्वाचे आहे. याचा सर्वाधिक परिणाम फुफ्फुसावर होतो. एवढेच नाही, तर अनेकांचे लिव्हर खराब झाल्याचेही संकेत मिळाले आहेत.' अनेक मेटाबॉलिक फिचर्स सर्वसाधारण परीक्षणांत दिसून येत नाहीत. वेळेनुसार यात बदल होऊन आजार आणखी वाढू लागतो. अशात आपले, 'मेटाबॉलिक मॉडेल' अत्यंत उपयोगी ठरू शकते आणि वेळ असतानाच लोकांवर उपचार होऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या -

कपिल सिब्बल, आझाद भडकताच 'हे' दिग्गज नेते राहुल गांधींच्या मदतीला; असे केले ट्विट...

CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्‍ट नसल्याचा दावा

CoronaVaccine : 73 दिवसांत नाही! सीरमनं स्वतःच सांगितलं COVISHIELD लस केव्हा येणार बाजारात

ट्रम्प यांना पॉर्नस्टारला 33 लाख रुपये द्यावे लागणार; 'तो' सनसनाटी आरोप पडला महागात

CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMedicalवैद्यकीयdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य