पृथ्वीचे ‘भावंड’ सापडल्याचा शास्त्रज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 02:59 AM2019-09-13T02:59:20+5:302019-09-13T06:47:58+5:30

उपरोक्त निष्कर्षाप्रत येताना विश्लेषकांच्या चमूने हब्बल दुर्बिणीद्वारे २०१६ व २०१७ या कालखंडात गोळा केलेल्या माहितीचे पृथक्करण केले

Scientists claim that Earth's 'sibling' was found | पृथ्वीचे ‘भावंड’ सापडल्याचा शास्त्रज्ञांचा दावा

पृथ्वीचे ‘भावंड’ सापडल्याचा शास्त्रज्ञांचा दावा

googlenewsNext

लंडन : आपल्या सूर्यमालिकेच्या बाहेर भ्रमंती करणाऱ्या एका ग्रहावर जलसाठा असल्याचा उत्कंठावर्धक शोध खगोलशास्त्रज्ञांनी लावला आहे. या ग्रहावर पृथ्वीसारखेच वातावरण असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली असून त्यावर जीवसृष्टी असल्याचा संभवही
व्यक्त केला आहे. ‘जर्नल नेचर अ‍ॅस्ट्रोनॉमी’ या नियतकालिकात प्रसिद्ध केलेल्या एका संशोधन प्रबंधात के२-१८ बी या पृथ्वीपेक्षा आठ पटीने मोठा असलेल्या ग्रहावर मानव वसतीसाठी आवश्यक असलेले वातावरण आणि पाणीही असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा ग्रह ज्या ताºयाभोवती भ्रमण करतो, त्याच्या वसाहतजन्य अवकाशाचे निरीक्षण करता तज्ज्ञ या निष्कर्षाप्रत आले आहेत. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे आंजेलोस त्सियारास यांनी या शोधाविषयी विस्तृत माहिती देताना लिहिले आहे की, के२-१८ हे पृथ्वीचे प्रतिरूप नव्हे,
कारण तो भलताच जड असून वातावरणातील घटकही वेगळेच आहेत. मात्र, पृथ्वी ही एकमेवाद्वितीय आहे का, या प्रश्नाच्या उत्तरासमीप त्याने आपल्याला आणून ठेवले आहे.

उपरोक्त निष्कर्षाप्रत येताना विश्लेषकांच्या चमूने हब्बल दुर्बिणीद्वारे २०१६ व २०१७ या कालखंडात गोळा केलेल्या माहितीचे पृथक्करण केले तसेच ताºयाच्या के२-१८च्या वातावरणातून झिरपणाºया प्रकाशाचे पृथक्करण करणारे ओपन सोर्स अ‍ेलोगेरिथ्मही विकसित केले. त्यातून वाफेचे अस्तित्व दर्शवणारे परिणाम मिळाले, जे हायड्रोजन आणि हेलियमच्या अस्तित्वाकडे निर्देश करतात.

Web Title: Scientists claim that Earth's 'sibling' was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Earthपृथ्वी