शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणे भारताकडे ५.६ अब्ज रुपये थकीत

By admin | Updated: July 18, 2014 01:43 IST

फाळणीला ६७ वर्षे उलटल्यानंतर पाकिस्तानने भारताकडे आपली तब्बल ५.६ अब्ज रुपयांची रक्कम थकीत असल्याचा दावा केला

कराची : फाळणीला ६७ वर्षे उलटल्यानंतर पाकिस्तानने भारताकडे आपली तब्बल ५.६ अब्ज रुपयांची रक्कम थकीत असल्याचा दावा केला असून यावरून वादंग होण्याची चिन्हे आहेत. भारत आपला ५.६ अब्ज रुपयांचे देणे लागतो. भारतीय रिझर्व्ह बँकेकडील (आरबीआय) ही थकबाकी फाळणीदरम्यानची आहे. फाळणीच्या वेळी ही रक्कम ४९ कोटी रुपये होती. फाळणीच्या ६७ वर्षांनंतर महागाई, चलन विनीमय दर व रोखे दरातील बदलांमुळे वाढून ती ५.६ अब्ज झाली असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तान आणि भारतादरम्यान झालेल्या कोणत्याही चर्चेत पाकने थकीत रकमेचा कधीही उल्लेख केलेला नाही. मात्र, स्टेट बँक आॅफ पाकिस्तान दरवर्षी आपल्या वार्षिक अहवालामध्ये भारताकडील कथित थकीत रकमेचा उल्लेख करते. आतापर्यंत याबाबत फारशी चर्चा झाली नव्हती; मात्र पाक माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरल्याने त्यावर आता चर्चा सुरू झाली आहे. (वृत्तसंस्था)स्वातंत्र्याच्या वेळी ४९ कोटी रुपयांची थकबाकी होती; मात्र महागाई, चलन विनिमय दर व समभाग दरातील बदलांमुळे यात वेगाने वाढ झाली, असे एक्स्प्रेस ट्रीब्यूनमध्ये प्रकाशित एका वृत्तात म्हटले आहे. स्टेट बँक आॅफ पाकिस्ताननुसार ४.१ अब्ज रुपयांची सोन्याची नाणी, ५० कोटींचे ब्रिटिशकालीन रोखे, भारत सरकारचे २४ कोटी रुपयांचे रोखे आणि ४९ लाख रुपयांची नाणी एवढी पाकची भारतावर थकबाकी आहे. १९४७ मध्ये झालेल्या एका करारावरून पाक हा दावा करतो. या करारानुसार फाळणीनंतरही दोन्ही देशांची एकच बँक भारतीय रिझर्व्ह बँक होती आणि ३० सप्टेंबर १९४८ पर्यंत पाकमध्ये भारतीय रुपया चालत होता.