शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे...तिच्या मृत्यूची किंमत केवळ ९ लाख, भारतीय मुलीच्या मृत्यूवर पोलिस हसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 06:37 IST

United State: अमेरिकेच्या सिएटल शहरात पोलिसांच्या गस्ती वाहनाची धडक लागून जान्हवी कमदुला या भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. अपघातानंतर चौकशीसाठी आलेल्या पोलिस अधिकाऱ्याने तिच्या मृत्यूची खिल्ली उडवली.

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या सिएटल शहरात पोलिसांच्या गस्ती वाहनाची धडक लागून जान्हवी कमदुला या भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. अपघातानंतर चौकशीसाठी आलेल्या पोलिस अधिकाऱ्याने तिच्या मृत्यूची खिल्ली उडवली. त्याचा व्हिडीओ आणि ऑडिओ व्हायरल झाला आहे. सॅन फ्रान्सिस्कोतील भारतीय वकिलातीने या घटनेचा निषेध करत कारवाईची मागणी केली  आहे. 

पोलिस अधिकारी भारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची खिल्ली उडवत असताना त्याच्या शरीरावरील कॅमेरा (बॉडीकॅम) सुरू होता. त्यात त्याचे हे बोलणे ध्वनिमुद्रित झाले आहे. मुलगी अपघातानंतर ४० फूट उडाली नव्हती. मात्र, ती दगावली, असे तो त्यात म्हणतो. त्यानंतर तो जोरजोराने हसतो. नंतर म्हणतो ती एक सामान्य व्यक्ती होती. ११ हजार डॉलरचा (९ लाख रुपये) चेक दिल्याने काम होऊन जाईल. त्यानंतर तो पुन्हा हसत म्हणतो, ती केवळ २६ वर्षांची होती. तिच्या मृत्यूची किंमत अतिशय कमी होती.  

जानेवारी महिन्यात जान्हवीचा मृत्यू झाला होता. एका कर्मचाऱ्याने नियमित तपासणीचा भाग म्हणू ध्वनीमुद्रित संभाषण ऐकल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली. (वृत्तसंस्था)

मी केवळ ॲटर्नीची नक्कल करत होतो...जान्हवीच्या मृत्यूची खिल्ली उडविणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचे डॅनियल ऑडेेरेर असे नाव आहे. त्याने त्याच्यावर होत असलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगितले. तो म्हणाला, मी केवळ शहराच्या ॲटर्नीची नक्कल करत होतो. जे अशा प्रकरणांत शिक्षा सुनावताना हलगर्जीपणा करतात. मात्र, कम्युनिटी पोलिस कमिशनने या प्रकरणावर टीका केली असून, हे अत्यंत दु:खद असल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :United StatesअमेरिकाPoliceपोलिसAccidentअपघातIndiaभारत