ऑनलाइन लोकमत
रियाध, दि. ६ - दहशतवाद्यांनी केलेल्या आत्माघाती बॉम्ब हल्ल्यात सौदीचे १७ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. सौदीतील दक्षिणेकडील भागात असलेल्या अभा या शहरातील मशिदीवर हा हल्ला करण्यात आला.
येथील स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, अभा येथील मशीदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी पोलिस गेले असता दहशतवाद्यांनी आत्माघाती बॉम्ब हल्ला केला. यावेळी मशिदीमध्ये सौदीचे स्पेशल फोर्स असलेल्या स्वात म्हणजेच, स्पेशल वेपन्स अॅन्ड टॅकटिक्सचे पोलिस कर्मचारी यांच्यासह अन्य काही नागरिक उपस्थित होते. यात १३ पोलिसांसह चार नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, हा हल्ला इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने केला असल्याचे सांगण्यात येत असून सौदीत हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.