सौदी अरेबियानं लाखो मुस्लिमांना मक्केबाहेरच रोखलं, नेमके काय घडलं? हज दरम्यानच का घेण्यात आला हा मोठा निर्णय? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 11:21 IST2025-06-02T11:19:47+5:302025-06-02T11:21:36+5:30

सौदी अरेबियाने २६९६०० हून अधिक लोकांना मक्केत प्रवेश करण्यापासून रोखले आहे...

Saudi Arabia stopped millions of Muslims from entering Mecca, what exactly happened know about Why was this big decision taken during Hajj | सौदी अरेबियानं लाखो मुस्लिमांना मक्केबाहेरच रोखलं, नेमके काय घडलं? हज दरम्यानच का घेण्यात आला हा मोठा निर्णय? जाणून घ्या

सौदी अरेबियानं लाखो मुस्लिमांना मक्केबाहेरच रोखलं, नेमके काय घडलं? हज दरम्यानच का घेण्यात आला हा मोठा निर्णय? जाणून घ्या

सौदी अरेबियाने २६९६०० हून अधिक लोकांना हज परमिटशिवाय मक्केत प्रवेश करण्यापासून रोखले आहे. यासंदर्भात बोलताना, आमचा उद्देश हजमध्ये होणारी अधिकची गर्दी रोखणे, असा असल्याचे एका अधिकाऱ्यांने रविवारी (१ जून २०२५) म्हटले आहे. खरे तर, सौदी अरेबिया सरकार मक्केत होणाऱ्या गर्दीमुळे  परमिटशिवाय येणाऱ्या यात्रेकरूंना दोषी ठरवते. एवढेच नाही, तर गेल्या वर्षी उन्हामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये अशा भाविकांची संख्या अधिक होती. याशिवाय, विना परमिट हजलामध्ये येणाऱ्यांसाठी ५,००० डॉलर्सपर्यंत दंड आणि हद्दपारीसारख्या शिक्षेचीही तरतूद आहे.

सौदीमध्ये राहणाऱ्यांनाही घ्यावे लागेल परमिट -
नियमाप्रमाणे, केवळ परमिट असलेल्यांनाच हज करण्याची परवानगी दिली जाते. यात, सौदी अरेबियाचे आणि तेथील नागरिकांचाही समावेश आहे. अधिकाऱ्यांनी हज नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 23 हजारहून अधिक सौदीच्या नागरिकांना दंड केला आहे. तसेच 400 हज कंपन्यांचे लायसन्स देखील रद्द केले आहेत.

सध्या मक्केत 14 लाख मुस्लीम
एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या मक्केत अधिकृतपणे १४ लाख मुस्लीम आहेत. येत्या काळात ही संख्या वाढू शकते. हज ही मक्का येथे होणारी वार्षिक इस्लामिक तीर्थयात्रा आहे. यात अनेक धार्मिक विधींचा समावेश असतो. मुस्लीम धर्मात, हज करणे हे शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे देयित्व आहे.

5 दिवसांच्या यात्रेसाठी येतात 20 लाख लोक -
गेल्या काही वर्षांत सौदी अरेबियातील गर्मीचा हज यात्रेवरही मोठा परिणाम झाला आहे. कार यात्रेकरू दिवसाच्या गर्मीमध्येच उघड्यावर आपले विधी  करतात. महत्वाचे म्हमजे, 20 लाख हून अधिक लोक या 5 दिवसीय तीर्थयात्रेसाठी सौदी अरेबियामध्ये पोहोचतात. यावेळी अनेकवेळा चेंगराचेंगरीही दिसून आली आहे. 
 

Web Title: Saudi Arabia stopped millions of Muslims from entering Mecca, what exactly happened know about Why was this big decision taken during Hajj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.