शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

सौदी अरेबियाने पाकच्या नकाशातून पीओके वगळले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 04:59 IST

POK News : प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या २१-२२ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेच्या निमित्ताने सौदी अरेबियाने २० रियालची एक बँकनोट जारी केली आहे.

लंडन : सौदी अरेबियानेपाकिस्तानच्या नकाशातून पाकव्याप्त काश्मीर (पीओके), गिलगिट आणि बाल्टिस्थानला हटविल्याची माहिती (पीओके) कार्यकर्ते अमजद अयुब मिर्जा यांनी नुकतीच दिली. त्यांनी हे सांगताना नकाशाचा फोटो ट्वीट करीत त्यावर लिहिले आहे की, सौदी अरेबियाकडूनभारताला दिवाळीची भेट, पाकिस्तानच्या नकाशातून गिलगिट, बाल्टिस्थान आणि काश्मीरला हटविले. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या २१-२२ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेच्या निमित्ताने सौदी अरेबियाने २० रियालची एक बँकनोट जारी केली आहे. या नोटेवर छापलेल्या जगाच्या नकाशात गिलगिट, बाल्टिस्थान आणि काश्मीर हे प्रदेश पाकिस्तानात दाखविण्यात आलेले नाहीत. या नोटेच्या एका बाजूला सौदीचे राजे सलमान बिन अब्दुल अजीज यांचे छायाचित्र आणि एक घोषणा आहे. असे करून सौदीने पाकिस्तानला अपमानित केले आहे, असे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने १५ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या तथाकथित गिलगिट-बाल्टिस्थान विधानसभा निवडणुकांबाबत तीव्र आक्षेप सप्टेंबर महिन्यातच नोंदविला होता. गिलगिट, बाल्टिस्थान यांच्यासह जम्मू-काश्मीर, तसेच लडाख हे भारताचे अविभाज्य घटक असल्याचे पुन्हा एका ठणकावून सांगितले होते. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकचा नवा नकाशा जारी करून त्यात जम्मू आणि काश्मीर, लडाख, जुनागढ, गुजरातमधील खाडी आणि मानावदर या प्रदेशांवर दावा सांगितला होता.  जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० भारताने रद्दबातल केल्याच्या वर्षपूर्तीवेळी पाकिस्तानने असे करून आपला जळफळाट व्यक्त केला होता. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPakistanपाकिस्तानsaudi arabiaसौदी अरेबिया