शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सौदी अरेबिया, यूएई, अमेरिका आणि भारत सुरू करणार 'हा' मेगा प्रोजेक्ट, चीनची झोप उडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 14:16 IST

हे देश एका मेगा प्रोजेक्टवर काम सुरू करणार असून यामुळे चीनची झोप उडणार आहे.

भारत, अमेरिका, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया लवकरच रेल्वे नेटवर्कद्वारे मध्य पूर्व देशांना जोडणाऱ्या प्रकल्पावर काम सुरू करू शकतात. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून मध्य-पूर्वे देशांना समुद्रमार्गे दक्षिण आशियाशी जोडलं जाणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. या संदर्भात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रविवारी सौदी अरेबियामध्ये अमेरिका, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमधील त्यांच्या समकक्षांची भेट घेतली.

अमेरिकन न्यूज वेबसाइट ॲक्सिओस नुसार, या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी अमेरिकेनं प्रस्तावित केलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर चर्चा केली. दरम्यान, या प्रकल्पात भारताच्या रेल्वे नेटवर्कचं जाळं टाकण्याचं कौशल्य वापरण्याची इच्छा अमेरिकेनं व्यक्त केली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून अमेरिकेला चीनचा वाढता प्रभाव आणि मध्य पूर्व भागातील त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा प्रभाव कमी करायचा आहे.

अहवालात म्हटलंय की ब्लू डॉट नेटवर्क या नावानं ओळखल्या जाणार्‍या या प्रकल्पाची पायाभरणी १८ महिन्यांपूर्वी I2U2 फोरममध्ये झालेल्या संभाषणात झाली होती. या फोरममध्ये भारत, इस्रायल, अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरातीचा समावेश आहे. २०२१ च्या शेवटी, मध्यपूर्वेतील धोरणात्मक पायाभूत सुविधा प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी हा मंच तयार करण्यात आला. मध्य पूर्व भागाला जोडणाऱ्या प्रकल्पात भारताचं रेल्वे नेटवर्कचं कौशल्य अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन यांनी गुरुवारी वॉशिंग्टन इन्स्टिट्यूट फॉर नियर ईस्ट पॉलिसी येथे भाषणादरम्यान या प्रकल्पावर काम सुरू होऊ शकतं असे संकेत दिले आहेत. भारताची तीन महत्त्वाची रणनीतीक उद्दिष्ट पूर्ण होत असल्यानं भारत सरकारला या प्रकल्पाशी जोडलं जावं अशी इच्छा असल्याचं इंडियनं एक्स्प्रेसनं सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलंय.

टॅग्स :Indiaभारतsaudi arabiaसौदी अरेबियाUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीrailwayरेल्वे