शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
2
१ फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार; ब्रँड अन् लांबीवरून ठरणार किंमत
3
कर्नाटकात बॅनर वादातून रक्तरंजित खेळ! दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी; गोळीबारात एकाचा मृत्यू
4
अखेरच्या क्षणी महिंद्राची टाटाला ओव्हरटेक! तिसऱ्या नंबरवर फेकली गेली; किया, एमजीची चांगली कामगिरी...
5
माओवादी कमांडर बारसे देवा पोलिसांना शरण! ‎​हिडमाच्या खात्म्यानंतर नक्षली बॅकफूटवर: तेलंगणात केले आत्मसमर्पण
6
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
7
फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
8
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
9
एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या ५ पद्धती जाणून घ्या अन् काळजी घ्या
10
वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेना नेत्याच्या लेकीचा अंत; बाथरूममधील 'त्या' एका चुकीने घात केला
11
अनेक बचत खात्यांचा सापळा; जास्त बचत खात्यांमुळे नेमका फटका कसा बसतो?
12
नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...
13
१ फेब्रुवारी २०२६ पासून सिगरेट महागणार, कोणत्या Cigarette ची किती वाढणार किंमत?
14
Indian Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,४२० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
15
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
16
कर महसुलात महाराष्ट्रच ‘किंग’; देशाच्या एकूण तिजोरीत २२% वाटा एकट्या महाराष्ट्राचा
17
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
18
कर्जाच्या जाळ्यात अडकली तरुणाई, विना गॅरंटी कर्जाची थकबाकी वाढतेय; बँकांवर ताण - आरबीआय
19
फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार
20
ग्रंथदिंडीतून साहित्याचा जागर; तब्बल ५६ चित्ररथांच्या दोन किलोमीटर ग्रंथदिंडीने फेडले डोळ्याचे पारणे
Daily Top 2Weekly Top 5

नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 13:40 IST

पाकिस्तानी माध्यमांनुसार, सरबजीतने नासिरशी निकाह केला असून, त्यांनी धर्म परिवर्तन करून आपले नावही बदलले आहे.

पंजाबमधील कपूरथला येथील ४८ वर्षीय सरबजीत कौर गुरुद्वाराला भेट देण्यासाठी पाकिस्तानला गेल्या होत्या. मात्र, परतताना गायब झाल्यामुळे चर्चेत आल्या होत्या. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सरबजीत कौर ४ नोव्हेंबर २०२५ रोजी शीख जत्थ्यासह प्रकाश पर्व साजरा करण्यासाठी पाकिस्तानात गेल्या होत्या. मात्र, त्यांचा पूर्ण ग्रुप भारतात परतल्यावर त्या बेपत्ता असल्याचे आढळले. यामुळे दोन्ही देशांमध्ये मोठी खळबळ माजली होती. आता पुन्हा एकदा त्या गायब झाल्याने नवा वाद रंगला आहे.

सुरुवातीला, सरबजीतच्या निकाहबद्दलचे उर्दूमध्ये लिहिलेले पत्र व्हायरल झाले होते. आता व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये त्या ४३ वर्षीय पाकिस्तानी तरुण नासिर हुसैनसोबत दिसल्या आहेत.

धर्म परिवर्तन करून झाल्या नूर हुसैन

पाकिस्तानी माध्यमांनुसार, सरबजीतने नासिरशी निकाह केला असून, त्यांनी धर्म परिवर्तन करून आपले नावही बदलले आहे. आता सरबजीत कौर धर्म बदलून नूर हुसैन बनल्या आहेत. नवीन व्हायरल व्हिडीओनुसार, ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सरबजी शेखपुरा येथील दंडाधिकाऱ्यासमोर हजर झाल्या. यावेळी सरबजीत यांनी सांगितले की, "मी नासिरला गेल्या ९ वर्षांपासून ओळखते. मी नासिरवर प्रेम करते आणि माझ्या इच्छेनुसार इस्लाम धर्म स्वीकारला आहे. माझ्यावर कोणीही कोणताही दबाव आणलेला नाही."

पतीसोबत राहण्याची इच्छा व्यक्त

'द एक्सप्रेस ट्रिब्यून'च्या अहवालानुसार, त्यांनी न्यायिक दंडाधिकारी शाहबाज हसन राणा यांच्यासमोर तिच्या पतीसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. शेखपुरा जिल्हा बारचे सदस्य असलेले वकील अहमद हसन पाशा यांनी न्यायालयात तिचे प्रतिनिधित्व केले. आपल्या निवेदनात, कौर यांनी स्पष्ट केले की, त्यांनी स्वतंत्रपणे इस्लाम स्वीकारण्याचा आणि पाकिस्तानी व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता त्यानं पती नासिर हुसैनसोबत राहायचे आहे.

५ नोव्हेंबरला झाला निकाह

रिपोर्टनुसार, सरबजीतने सांगितले की त्यांचा निकाह ५ नोव्हेंबर २०२५ रोजी शेखपुरा जिल्ह्यातील फारूकाबाद येथे झाला. मेहर म्हणून ठरवलेली ₹१०,०००/-ची रक्कम आधीच अदा करण्यात आली आहे. न्यायालयात सादर केलेल्या याचिकेत त्यांनी आपल्यावर कोणताही दबाव नसल्याचे पुन्हा सांगितले आहे आणि त्यांचे नवीन इस्लामिक नाव 'नूर हुसैन' असल्याची पुष्टी केली आहे. विवाह प्रमाणपत्रात त्यांना घटस्फोटित महिला आणि दोन मुलांची आई म्हणून नमूद केले आहे.

घरी लागलेले आहे कुलूप, वकीलही चिंतित

सरबजीत घटस्फोटित असून, अमानीपूर गावात आपल्या दोन मुलांसोबत राहत होत्या. केंद्रीय संस्था आणि पोलिसांनी मुलांची चौकशी केल्यावर त्यांना सरबजीतच्या पाकिस्तानात राहण्याबद्दल माहिती मिळाली. टाइम्स ऑफ इंडियानुसार, तळवंडी चौधरियांचे एसएचओ निर्मल सिंह यांनी सांगितले की, सरबजीत कौरविरुद्ध यापूर्वीही तीन गुन्हे दाखल आहेत.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, सरबजीत आणि नासिरचे वकील अहमद हसन पाशा यांनी सांगितले की, हे लग्न शेखपुराच्या संबंधित युनियन कौन्सिलमध्ये नोंदणीकृत झाले आहे. १५ नोव्हेंबर रोजी पाशा यांनी दोघांनाही अधिकारी आणि प्रसारमाध्यमांसमोर स्टेटमेंट देण्यासाठी बोलावले होते, मात्र ते आले नाहीत. आता नासिर हुसैनचा मोबाईल फोनही बंद येत आहे. पाशा यांनी भीती व्यक्त केली आहे की, "हे दोघेही कोणत्याही कायदेशीर कारवाईच्या शक्यतेमुळे घाबरले असावेत."

व्हिसाची मुदत वाढवण्याची प्रक्रिया सुरू

पाशा यांनी पुढे सांगितले की, सरबजीत कौरच्या व्हिसाची मुदत अद्याप वाढलेली नाही आणि त्यांनी या संदर्भात लाहोर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी सोमवारी होण्याची अपेक्षा आहे.

शेखपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरबजीत आणि नासिर हुसैनचा शोध घेण्यासाठी अधिकाऱ्यांचे एक पथक फारुखाबादला पाठवण्यात आले होते, परंतु त्यांच्या घराला कुलूप लागले आहे. नासिर हुसैन आणि त्याचे कुटुंब कुठे आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, नासिर आधीच विवाहित असल्याची माहितीही समोर आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sarabjit Kaur Missing Again After Marriage Video; Lawyer Expresses Concern.

Web Summary : Sarabjit Kaur, after marrying Nasir Hussain in Pakistan and converting to Islam, has disappeared again. Her lawyer expresses concern as their home is locked and Nasir's phone is off, amidst visa extension efforts.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत