रशियाच्या विरोधीपक्ष नेत्याला अटक
By Admin | Updated: March 27, 2017 01:43 IST2017-03-27T01:43:07+5:302017-03-27T01:43:07+5:30
रशियाच्या राजधानीचे शहर असलेल्या मॉस्को शहरात भ्रष्टाचारविरोधी अभियान छेडणार्या रशियाचा विरोधी पक्ष नेता

रशियाच्या विरोधीपक्ष नेत्याला अटक
>मॉस्को: रशियाच्या राजधानीचे शहर असलेल्या मॉस्को शहरात भ्रष्टाचारविरोधी अभियान छेडणार्या रशियाचा विरोधी पक्ष नेता अलेक्सी नॅव्हलीन यास रविवारी त्यांच्या सर्मथकांसह अटक करण्यात आली. पंतप्रधान डिमित्री मेदव्हेद यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असून, त्यांच्यावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात ५00 हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.