Indonesia: झाडाभोवती 'न्यूड फोटो' काढले, रशियन महिलेला देशातून हद्दपार केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 07:12 IST2023-04-22T07:11:56+5:302023-04-22T07:12:09+5:30

Indonesia: इंडोनेशियाच्या बालीमधील एका प्राचीन झाडासमोर नग्न फोटो काढणे रशियन पर्यटक महिलेला महागात पडले. आधी तिला अटक झाली आणि आता बालीमधून इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी तिला हद्दपार केले आहे

Russian woman deported for taking 'nude photos' around tree | Indonesia: झाडाभोवती 'न्यूड फोटो' काढले, रशियन महिलेला देशातून हद्दपार केले

Indonesia: झाडाभोवती 'न्यूड फोटो' काढले, रशियन महिलेला देशातून हद्दपार केले

इंडोनेशियाच्या बालीमधील एका प्राचीन झाडासमोर नग्न फोटो काढणे रशियन पर्यटक महिलेला महागात पडले. आधी तिला अटक झाली आणि आता बालीमधून इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी तिला हद्दपार केले आहे.

लुईझा कोसिख (४०) हिने इन्स्टाग्रामवर बालीच्या तबानान मंदिरातील प्राचीन वृक्षाभोवती स्वतःचे न्यूड फोटो काढून अपलोड केले होते. बालीमधील स्थानिक हिंदू या ७०० वर्षे जुन्या झाडाला पवित्र मानतात. बालीनी हिंदू संस्कृतीत पर्वत, झाडे आणि इतर नैसर्गिक वैशिष्ट्ये पवित्र मानली जातात, कारण ती देवांची घरे आहेत असे मानले जाते. लुईझाचे तीन फोटो ११ एप्रिलला एका स्थानिक महिलेने ‘आमच्या भूमीचा अनादर करणाऱ्या सर्व परदेशी लोकांनो, बाली आमचे घर आहे, तुमचे नाही..’ अशा कॅप्शनसह पोस्ट करत सडकून टीका केली होती. “आमच्या पवित्र झाडांभोवती नग्न छायाचित्रे काढून तुम्ही ‘कूल’ दिसाल असे तुम्हाला वाटते का? जर आमच्या परंपरा आणि संस्कृतीचा आदर करू शकत नसाल तर तुमच्या देशात परत जा” असेही तिने लिहिले होते. तिची पोस्ट लगेचच व्हायरल झाली आणि नागरिकांचा पारा चढला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी लुईझाला अटकही झाली होती. 

Web Title: Russian woman deported for taking 'nude photos' around tree